अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’मधील फैजल खानच्या भूमिकेमुळे नवाजला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्याने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारून वेबसीरिजच्या विश्वातही आपला दबदबा निर्माण केला. या गाजलेल्या भूमिकांशिवाय नवाजुद्दिन सिद्दिकीने कतरिना कैफ आणि जॉन अब्राहमच्या ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात कॅमिओ केला होता. याविषयी कबीर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : Video : “दीपिकाची कॉपी, ढासळलेला आत्मविश्वास…”, आलिया भट्टचा ‘तो’ रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल
दिग्दर्शक कबीर खानने ‘ह्युमन्स ऑफ सिनेमा’ला दिलेल्या मुलाखतीत ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात नवाजुद्दिनने केलेल्या साकारलेल्या कॅमिओवर भाष्य केले आहे. कबीर खान म्हणाला, “नवाजुद्दीनने ‘न्यूयॉर्क’ चित्रपटासाठी दिलेली ऑडिशन खूप जास्त प्रभावी होती. अली अब्बास जफर या चित्रपटात माझा सहायक होता त्याने मला नवाजची ऑडिशन दाखवली. तेव्हा मी त्याला म्हणालो होतो काही करा पण, हा माणूस आपल्या चित्रपटात पाहिजे.”
हेही वाचा : “स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला
कबीर खान पुढे म्हणाला, “नवाजुद्दिनच्या सीनचे शूट करताना मी नॉनस्टॉप ३ ते ४ मिनिटांचा वन टेक सीन शूट केला. मला दुसरा टेक घेण्याची गरजच लागली नाही कारण, जेव्हा मी कट म्हणालो, तेव्हा क्रूमधील काही लोक रडत होते आणि त्यांच्यापैकी काहीजण टाळ्या वाजवत होते. त्यानंतर दिवंगत अभिनेते इरफान खान तासाभरानंतर सेटवर आले होते. त्यांनी ऐकले की सर्वजण नवाजचे कौतुक करत आहेत.”
“इरफान खान यांना मी स्वत: मॉनिटरकडे घेऊन गेलो आणि त्यांना नवाजुद्दिनचा टेक दाखवला. नवाजचा अभिनय पाहून इरफान खान यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांनी लगेच नवाजला मिठी मारली”, असे दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले.
दरम्यान, नवाजुद्दिन सिद्दिकीने ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात ‘झिलगाई’ ही भूमिका साकारली आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर ‘झिलगाई’ला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात येते. पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा छळ केला जातो मात्र, पुढे त्याची सुटका होते. या चित्रपटात इरफान खानने एफबीआय एजंटची भूमिका केली होती.