बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर आणि आयफा या दोन पुरस्कार समारंभांना एक वेगळंच महत्त्व आहे. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला, आता त्या पाठोपाठ आयफा २०२३ पुरस्कार सोहळाही नुकताच पार पडला. बॉलिवूडमधील बड्याबड्या सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली. रेड कारपेटवर बऱ्याच अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
अभिषेक बच्चन आणि विकी कौशल यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. फिल्मफेअरप्रमाणेच यंदाच्या आयफा सोहळ्यातही आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा डंका पाहायला मिळाला. यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार हृतिक रोशनला ‘विक्रम वेधा’ या चित्रपटासाठी मिळाला, तर आलिया भट्टला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘गंगूबाई काठीयावाडी’साठी मिळाला. अनिल कपूर यांनाही ‘जुग जुग जियो’साठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
आणखी वाचा : Video: “दोन दिवस त्रास झाला पण…” व्हायरल झालेल्या ‘त्या’ बोल्ड सीनबद्दल प्रिया बापट स्पष्टच बोलली
दिग्गज अभिनेते कमल हासन यांना यंदाचा आयफा २०२३ चा चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाचा विशेष पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार देताना सगळ्यांनी उभं राहून कमल यांना शुभेच्छा दिल्या आणि सगळेच यावेळी प्रचंड भावूक झाले होते. ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांना तांत्रिक विभागातही बरेच पुरस्कार मिळाले.
यंदाच्या आयफा विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे :
१. उत्कृष्ट चित्रपट : दृश्यम २
२. उत्कृष्ट दिग्दर्शक : आर माधवन (रॉकेट्री द नांबी इफेक्ट)
३. उल्लेखनीय कामगिरी प्रादेशिक चित्रपट : रितेश देशमुख दिग्दर्शित वेड
४. उत्कृष्ट पार्श्वगायिका : श्रेया घोषाल – रासिया (ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा)
५. उत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंग – केसरिया (ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा)
६. उत्कृष्ट छायाचित्रण, संवाद आणि पटकथा : गंगूबाई काठियावाडी
७. उत्कृष्ट संकलन : दृश्यम २
८. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : विक्रम वेधा