तीन दिवसांपूर्वी देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुलगी मालती मारीबरोबर भारतात आली. त्यानंतर आज प्रियांकाचा पती व आंतरराष्ट्रीय गायक निक जोनासही भारतात आला आहे. निक जोनासचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आहे. निक प्रियांका व मालतीसाठी मुंबईत आला आहे, असं म्हटलं जातंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्रा तिची मैत्रीण अंजुला अचारिया व मुलगी मालती मारीसह १४ मार्च रोजी मुंबईत आली. प्रियांकाने एका ज्वेलरी ब्रँडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच ती ईशा अंबानीच्या होळी पार्टीला उपस्थित राहिली. त्यानंतर आता निक जोनासही भारतात आला आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत निक पापाराझींना पोज देताना दिसला.

बहीण मीराच्या लग्नानंतर दोन दिवसांनी अचानक भारतात आली प्रियांका चोप्रा, मुलीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

निकच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी जावईबुवांचं भारतात स्वागत आहे, असं म्हटलं आहे. तर, काहींनी इतका मोठा आंतरराष्ट्रीय स्टार फक्त एका सुरक्षारक्षकासह प्रवास करत आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, निक जोनास भारतात नेमका का आला आहे, यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पण प्रियांका आणि मालती इथे असल्याने त्यांच्याबरोबर मुंबईत वेळ घालविण्यासाठी निक भारतात आल्याची चर्चा आहे. यापूर्वी एका कॉन्सर्टसाठी निक भावांबरोबर मुंबईत आला होता, त्यावेळी प्रियांका त्याच्याबरोबर आली नव्हती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas arrived in mumbai after wife priyanka chopra and daughter malti marie video viral hrc