अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न करून अमेरिकेला स्थायिक झाली. प्रियांका आणि निक विविध कारणांनी चर्चेत असतात. ते दोघंही बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसतात. आता पहिल्यांदाच निकने प्रियांका आणि त्याच्या धर्माबद्दल भाष्य केलं आहे. ते दोघं त्यांची मुलगी मालती मेरीला हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मांची शिकवण देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक जोनासने नुकताच ‘आर्मचेअर एक्सपर्ट विथ डॅक्स शेपर्ड’ यांच्याशी एका पॉडकास्टच्या निमित्ताने संवाद साधला. यादरम्यान त्याने पहिल्यांदा त्याच्या आणि प्रियाका चोप्राच्या धर्माबाबत भाष्य केलं. याबद्दल बोलत असताना त्याने त्याचं देवाबरोबर कसं नातं आहे हेही सांगितलं आहे.

आणखी वाचा : “मी ते ऐकलं आणि…,” भारतात ‘जिजू’ म्हटलं जाण्याबाबत अखेर निक जोनासने दिली प्रतिक्रिया

निक म्हणाला, “माझं देवाशी खूप जवळचं नातं आहे. मी एका पुस्तकात वाचलं होतं अगदी तसं नाही पण ते खास आहे एवढं मात्र मी नक्की सांगेन. देवाची अनेक रूपं आहेत. मी एका भारतीय महिलेशी लग्न केलं आहे, ती हिंदू आहे. मी त्या धर्माविषयी खूप गोष्टी शिकल्या आहेत आणि त्यामुळे या धर्माबद्दल माझ्या मनात असणारा आदर आणखी वाढला. मालतीला आम्ही ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही धर्माची शिकवण देत आहोत. तिच्यात बायबल आणि हिंदू अशा दोन्ही विचारांची बैठक पाहायला मिळेल.

हेही वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उदघाटनाच्या निमित्ताने निक हा प्रियांका आणि त्यांची लेक मालती मेरीसह भारतात आला होता. या दौऱ्यादरम्यान त्याला भारतीयांकडून भरपूर प्रेम अनुभवायला मिळालं. याचबरोबर अनेकांनी तो भारतात आल्यावर त्याला ‘जिजू’ अशीही हाक मारली. इथल्या लोकांकडून मिळणारं प्रेम पाहून निक भारावून गेला, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas opens up about his and priyanka chopra religion rnv