अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास हे लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. निक व प्रियांका लेक मालती मेरीबरोबर अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असतात. बऱ्याचदा निक प्रियांकाची काळजी घेताना दिसतो. या जोडप्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आई श्वेता तिवारीच्या गरोदरपणाबद्दल कळाल्यानंतर ‘अशी’ होती १५ वर्षीय पलकची प्रतिक्रिया
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी ‘मेट गाला २०२३’ च्या रेड कार्पेट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फॅशन इव्हेंटचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये निक त्याची पत्नी प्रियांकाचा तोल बिघडल्यानंतर पडण्यापासून वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते निकचे कौतुक करत आहेत आणि त्याला परफेक्ट पती म्हणत आहेत.
“मला निकचे आभार मानायचे आहेत, जो प्रियांकाची नेहमीच प्रेमळपणे काळजी घेतो. आमची मुलगी प्रियांका निक जोनासजवळ सुरक्षित आहे,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.
प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री रिचर्ड मॅडनच्याबरोबरच्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजममुळे चर्चेत आहे. ती लवकरच ‘लव्ह अगेन’मध्ये दिसणार आहे.