ऐश्वर्या राय बच्चन( Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन हे जोडपं काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यांचा घटस्फोट झाला आहे ते ऐश्वर्या राय-बच्चन ही बच्चन कुटुंबाबरोबर राहत नाही, अशा अनेक चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात अभिषेक बच्चनची त्याच्या दसवी या चित्रपटातील सहकलाकार निम्रत कौर हिच्याशी रिलेशनशिप असल्याच्या चर्चाही होताना दिसत आहेत. आता या सगळ्यात अभिनेता व निर्माता निखिल द्विवेदीने एका मुलाखतीत ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सेटवर कसे वावरायचे, कसे वागायचे, याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला अभिनेता?
निखिल द्विवेदीने नुकतीच ‘फिल्मीज्ञान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “सेटवर आम्ही कधीच त्यांना वेगळे पाहिले नाही. त्यांचे लग्न झाले होते आणि त्यामुळे ते सतत एकत्र दिसत असायचे. असे असले तरीही त्यांच्या नात्याचा कामावर कधीच परिणाम झाला नाही. त्यांच्या नात्यामुळे कधीच कामामध्ये व्यत्यय आला नाही. ते कायमच खूप व्यावसायिक होते”, असे म्हणत निखिलने ऐश्वर्या आणि अभिषेक अव्यावसायिक असल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे म्हटले.
निखिल द्विवेदीने अभिषेक आणि ऐश्वर्याबरोबर रावण या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच तो अभिषेक बच्चनचा जवळचा मित्रसुद्धा आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. धूम २, कुछ ना कहो, गुरू अशा चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी २० एप्रिल २००७ ला लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली. तिचे नाव आराध्या, असे आहे. आराध्यादेखील तिच्या आई-वडिलांप्रमाणे चर्चांचा भाग बनताना दिसते. अनेकदा ती ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर विविध पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावत असते. मायलेकीच्या जोडीला, त्यांच्यामध्ये असलेल्या बॉण्डिंगला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते.
काही दिवसांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये काहीही सुरळीत चालू नसल्याचे म्हटले जात आहे. अभिषेकचे नाव अभिनेत्री निम्रत कौरबरोबर जोडले जात आहे. या सगळ्यात काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी निम्रतला दसवी या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक करणारे लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावर बच्चन कुटुंब, ऐश्वर्या राय किंवा निम्रत यांनी वक्तव्य केलेले नाही.
हेही वाचा: ‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
u
दरम्यान, अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटात दिसणार आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या राय पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसली होती. त्यामध्ये तिने साकारलेल्या नंदिनी या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.