बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ५ फेब्रुवारी रोजी त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नी ऐश्वर्या राय बच्चनने एक छान पोस्ट केली. ऐश्वर्याने अभिषेकच्या बालपणीचा जुना फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केले. तर काहींनी या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांवर चर्चा केली. एका चाहत्याने ट्रोल्सला टोला लगावला आणि विचारलं, ‘कुठे गेले घटस्फोटाबद्दल बोलणार?’ तर काही लोकांनी अभिनेत्री निम्रत कौरचा कमेंट्समध्ये उल्लेख केला. ट्रोलर्सनी निम्रत कौरची माफी मागायला हवी, असं काहींनी म्हटलं आहे.

८ वर्षांचा संसार मोडल्यावर पुन्हा प्रेमात पडल्याची अभिनेत्याने दिली कबुली; म्हणाला, ७ वर्षांच्या लेकीच्या संपर्कात नाही

ऐश्वर्याच्या या प्रेमळ पोस्टनंतर चाहत्यांना खात्री पटली की घटस्फोटाच्या बातम्या केवळ अफवा होत्या, त्या निराधार होत्या. एका युजरने ‘निम्रतला सॉरी म्हणा’ अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘आम्ही निम्रतची माफी मागितली पाहिजे.’ काही लोकांनी या जोडप्याच्या कथित घटस्फोटाची खिल्ली उडवली, तर एका कमेंटमध्ये ‘घटस्फोट होत नाहीये’ असं लिहिलं.

प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न

दरम्यान, सोशल मीडियावर १४.६ मिलियन फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते आणि ती म्हणजे तिचा नवरा अभिषेक होय. यावरूनही एका युजरने कमेंट केली आहे. ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एक व्यक्तीला फॉलो करते, त्यावरून तिचं व तिच्या पतीचं नातं किती घट्ट आहे हे दिसून येतं, असं युजरने लिहिलं आहे.

जया बच्चन यांची सून आहे ‘ही’ अभिनेत्री, २ वर्षे तुरुंगात कैद्यांबरोबर राहिली, आता आहे OTT क्वीन

अनंत अंबानी व राधिका मर्चंट या लग्नातील कार्यक्रमांना हे दोघेही वेगवेगळे आले होते, तसेच ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कोणतेही सदस्य दिसले नव्हते, तसेच कोणीही तिच्यासाठी पोस्टदेखील केली नव्हती. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. याचदरम्यान, अभिषेकचं नाव ‘दसवीं’मधील त्याची सहकलाकार निम्रत कौरशी जोडलं गेलं होतं. निम्रतमुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलं. त्यासाठी निम्रतला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळेच आता ट्रोलर्सनी तिची माफी मागायला हवी, अशा कमेंट्स चाहत्यांनी ऐश्वर्याच्या पोस्टवर केल्या आहेत.