Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा अजूनही सुरू आहे. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत गुजरातमधील जामनगरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूड, राजकीय, उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधील नीता अंबानी व ईशा अंबानी यांचा सुंदर परफॉर्मन्सचा व्हिडीओ समोर आला आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली.
हेही वाचा – Video: ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री झळकणार ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेत, पाहा प्रोमो
दरम्यान, २ मार्चला झालेल्या संगीत सोहळ्यात नीता अंबानी या लेक ईशा अंबानीसह परफॉर्म करताना दिसल्या. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, नीता अंबानी व ईशा अंबानी ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा – पूजा सावंत नवऱ्याबरोबर निघाली फिरायला, त्याआधी आईच्या हातच्या ‘या’ खास पदार्थाचा घेतला आस्वाद
अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.