Salman Khan Jamnagar Video: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने जामनगरमध्ये त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर, त्याने अंबानी कुटुंबाबरोबर रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली. सलमानने अंबानी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्याचं आयकॉनिक सुपरहिट गाणं “ओ ओ जाने जाना” सादर केलं.

इव्हेंटमधील एका व्हिडीओमध्ये सलमान कोकिलाबेन अंबानीसह सर्वांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहे. आणखी एका व्हिडीओ नीता अंबानींची आई पूर्णिमा दलाल सलमानला मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसल्या. या क्लिपमध्ये सलमान श्लोका अंबानीशी संवाद साधताना दिसत आहे.

nana patekar talked about manisha koirala
“तिचा फोन नंबर…”, मनीषा कोईरालाबद्दल विचारल्यावर काय म्हणालेले नाना पाटेकर? एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या होत्या चर्चा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
krk slams mika singh
“माझ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मारलं”, मिका सिंगच्या ‘त्या’ दाव्यांवर केआरकेचे उत्तर; कपिल शर्माबद्दल म्हणाला…
sanjay gupta slams naga vamsi
“४-५ हिट सिनेमे दिल्याने हे बॉलीवूडचे बाप होणार नाहीत”, दाक्षिणात्य निर्मात्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला दिग्दर्शक; नेमकं काय घडलं?
Bollywood actress Mouni Roy falla down after celebrating New Year with husband Suraj Nambiar video viral
Video: न्यू इअरच्या पार्टीतून बाहेर येताच अभिनेत्री जोरात पडली, पतीने सावरत नेऊन बसवलं गाडीत, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rajiv Kapoor was addicted to alcohol
राजीव कपूर यांना दारूचं व्यसन होतं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “त्यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी…”
Happy New Year budget collection
९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ बॉलीवूड चित्रपट?
amitabh bachchan touches chiranjeevi mother feet
Video : अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ कृतीने दाक्षिणात्य पुरस्कार सोहळ्यात वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – झणझणीत ठेचा अन्…; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतोय ‘हा’ मराठी तडका असलेला पदार्थ, किंमत किती? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

सलमान खान आणि अनंत अंबानी हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. सलमानने यंदा त्याचा ५९ वा वाढदिवस जामनगरमध्ये साजरा केला, या सेलिब्रेशनला त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. अंबानी कुटुंबाने सलमानच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन केलं होतं. या सोहळ्यात सलमानची बहीण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा, त्याची आई सलमा खान आणि सावत्र आई हेलन यांनी हजेरी लावली होती. सलमानने कुटुंबाबरोबर वाढदिवसाचा केक कापला, तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या सेलिब्रेशनमध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देखील सलमानसाठी टाळ्या वाजवताना दिसले होते. बॉलीवूडमधील इतर पाहुण्यांमध्ये रितेश देशमुख व जिनिलीया डिसुझा यांचा समावेश होता.

हेही वाचा – “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर दबंग खान अनंत अंबानी व राधिका मर्चंटबरोबर एका मॉलमध्ये दिसला होता. त्याचे मॉलमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात तो चाहत्यांना अभिवादन करताना दिसत होता.

हेही वाचा – “मी वैतागलो आहे”, अनुराग कश्यपने घेतला मुंबई सोडण्याचा निर्णय; म्हणाला, “मला जिथे काम…”

कामाबद्दल बोलायचं झाल्यास सलमान खान ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवालाची निर्मिती असलेल्या ‘सिकंदर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्यासह अनेक कलाकारांची मांदियाळी आहे. ‘सिकंदर’ सिनेमा २०२५ च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader