अभिनेत्री प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ सिद्धार्थ चोप्राने त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात शुक्रवारी (७ फेब्रुवारीला) मुंबईत पार पडला. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव नीलम उपाध्याय असून ती अभिनेत्री आहे. सिद्धार्थ व नीलम यांच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लग्नात आलेल्या पाहुण्यांची झलक पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ व नीलमच्या लग्नात चोप्रा व उपाध्याय कुटुंबातील सदस्य, तसेच दोघांचे मित्र-मैत्रिणी व जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या लग्नात बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटीही आले होते. तसेच अंबानी कुटुंबीयदेखील या लग्नाला हजर राहिले.

‘वूम्पला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत प्रियांका चोप्राचा पती सुप्रसिद्ध गायक निक जोनास दिसतोय. त्याच्या शेजारी नीता अंबानी उभ्या आहेत. नीता यांनी मरून रंगाची साडी नेसल्याचं व्हिडीओत दिसतंय. नीता यांच्या बाजूला त्यांची मोठी सून श्लोका मेहतादेखील दिसत आहे.

पाहा व्हिडीओ –

सिद्धार्थ व नीलमच्या लग्नातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत निक जोनास मेहुण्याच्या लग्नात हातात पूजेची थाळी घेऊन मंचावर जाताना दिसत आहे.

नीलम व सिद्धार्थ यांच्या लग्नात सदाबहार अभिनेत्री रेखा देखील आल्या होत्या. त्यांनी या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रादेखील पती राघव चड्ढाबरोबर या लग्नाला उपस्थित राहिली. परिणीतीने नीलम व सिद्धार्थचा एक व्हिडीओ पोस्ट करून या दोघांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

३६ वर्षीय सिद्धार्थ चोप्रा हा प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ आहे. तर त्याची पत्नी नीलम उपाध्याय ही ३१ वर्षांची आहे. नीलम व सिद्धार्थ मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नीलम आयुष्यात येण्यापूर्वी सिद्धार्थचा इशिका कुमारबरोबर साखरपुडा झाला होता, पण तो लग्नाच्या काही दिवसांआधी मोडला. त्यानंतर आता जवळपास सहा वर्षांनी सिद्धार्थ लग्नबंधनात अडकला आहे. नीलम उपाध्याय ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने तमिळ व तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अॅक्शन थ्रीडी, ओन्नाडू ओरू नाल, पंदगला वाचाडू, मेरा कर्तव्य माय ड्यूटी हे तिचे चित्रपट आहेत.