अभिनेत्री नोरा फतेही आपल्या नृत्य कौश्यल्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे आज जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या अनेक गाण्यात ती थिरकताना दिसून आली आहे. याबरोबरच नोरा सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे हॉट आणि बोल्ड लूक्स आणि वेगवेगळे रील्स यामुळे ती चर्चेत असते.
आता नुकतंच नोरा फतेहीचा ज्युनिअर बच्चनबरोबर थिरकतानाचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. १८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे’ या सुपरहीट गाण्यावर हे दोघेही आपल्याला या व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहेत.
आणखी वाचा : शाहरुख खानचा प्रतीप्रश्न, Swiggy ने दिलं उत्तर; #AskSRK दरम्यान नेमकं घडलं तरी काय?
१८ वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्यात अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चनही दिसली होती. या तिघांचाही जबरदस्त नाच, केमिस्ट्री आणि ते गाणं जबरदस्त हीट झालं होतं. अगदी कुणालाही थीरकायला भाग पाडणाऱ्या या गाण्यावर नाचताना आजही तितकीच मजा येते हे हा व्हिडीओ पाहून स्पष्ट होत आहे.
नोराने नुकतंच बांद्रा येथील एका इव्हेंटमध्ये उपस्थिती लावली. नोराने काळ्या रंगाचा सिल्क गाऊन परिधान केला होता. या पार्टीमध्ये बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. याच पार्टीत ‘कजरा रे’ या गाण्यावर कित्येकांचा थीरकताना हा व्हिडीओ मध्यरात्री शेअर करण्यात आला. या व्हिडीओवरुन असाही दावा करण्यात येत आहे की नोरा आणि अभिषेक लवकरच रेमो डिसूझाच्या नव्या डान्स प्रोजेक्टमध्ये एकत्र येणार आहेत. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.