बॉलीवूड अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल नोरा फतेही आपल्या आयटम नंबर्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. ‘हाय गर्मी’ असो किंवा ‘दिलबर दिलबर’, नोरा फतेहीचे गाणे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. नोरा फतेहीचं जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील’दिलबर दिलबर’ हे गाणदेखील खूप प्रसिद्ध झालं. आता अनेक वर्षांनंतर, नोरा फतेहीने या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे. या गाण्यासाठी नोराला खूप छोटा ब्लाउज परिधान करण्यास सांगण्यात आले होते, परंतु तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोरा फतेहीने नुकतेच इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्नमध्ये सहभागी झाली होती, तिने ‘दिलबर’ गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक खास प्रसंग शेअर केला. नोरा म्हणाली की, तिला गाण्यात खूप छोटा ब्लाउज परिधान करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तिने निर्मात्यांना विनंती केली की, तिला अति मादक रूपात दाखवू नये. नोरा म्हणाली की, तिला हे माहीत होते की गाणं सेक्सी आहे, परंतु त्याला वल्गर दाखवण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा…श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन

नोरा फतेहीने (Nora Fatehi स्पष्ट केले की तिने छोटा ब्लाउज परिधान करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने दिग्दर्शक मिलाप झवेरी यांना समजून सांगितले आणि अखेरीस तिच्यासाठी दुसरा ब्लाउज तयार करण्यात आला.

“जास्त क्लिवेज दाखवायचा नव्हता” – नोरा फतेही

नोरा फतेहीने पुढे सांगितले की, “माझ्यासाठी नवा ब्लाउज तयार करण्यात आल्यावर मला त्यात अधिक कंफर्टेबल वाटले. या गाण्यात मला माझ पोट दाखवण्यास हरकत नव्हती, पण मला जास्त क्लिवेज दाखवायचा नव्हता.मला अस वाटत काही प्रेक्षकांना ओवर-सिडक्टिव (मादक) दृश्य आवडत नाही.”

हेही वाचा…डिंपल यांच्या हातात होती ऋषी कपूर यांची अंगठी; राजेश खन्नांनी प्रपोज करताना ‘ती’ अंगठी पाहिली अन्…; पुढे काय घडलं? वाचा

दिग्दर्शकांना समजावण होतं कठीण

नोरा फतेहीने छोट्या ब्लाउजच्या मुद्द्यावर दिग्दर्शक मिलाप झवेरी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना सांगितले की, ती नवखी असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष तिच्या चेहऱ्यावर आणि डान्स मूव्ह्जवर असावे. गाणं आणि म्युझिक प्रभावी होतं आणि त्याला अति-सिडक्टिव न दाखवता सादर केल्याने त्याची गुणवत्ता वाढेल अस नोराच मत होत . अखेरीस, मिलाप झवेरी यांनी नोराची मागणी मान्य केली.

हेही वाचा…कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

नोरा फतेहीने २०२४ मध्ये ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिच्याबरोबर प्रतीक गांधी आणि दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi denied to wear small blouse during dilbar dilbar song shooting psg