बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही सोशल मीडियावर काही ना काही कारणांनी चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील फोटो तर कधी तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नोरा फतेहीने डान्सर म्हणून भारतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण सध्या नोरा फतेही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत नोराने तिच्या प्रेमभंगाची कबुली दिली आहे. ज्यात तिला डिप्रेशनचाही सामना करावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार काही वर्षांपूर्वी नोरा फतेही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. अर्थात या दोघांनीही कधीच या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. पण अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. अंगद आणि नोराचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर नोरा तिच्या कामात व्यग्र झालं तर दुसरीकडे अंगदने अभिनेत्री नेहा धुपियाशी संसार थाटला.

आणखी वाचा- Photos : नोरा फतेहीच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री, जाणून घ्या तो मिस्ट्रीबॉय नक्की कोण?

ब्रेकअपनंतर नोरा फतेहीची अवस्था कशी झाली होती याबाबत तिने ‘बाय इनवाइट ओन्ली’ या टॉक शोमध्ये खुलासा केला आहे. नोरा फतेहीने या चॅट शोमध्ये अंगद बेदी किंवा कोणाचंही नाव घेतलेलं नाही मात्र ब्रेकअपनंतर तिला बराच काळ डिप्रेशनचा सामना करावा लागल्याची कबुली दिली. याच डिप्रेशनचा अनुभव तिने या मुलाखतीत सांगितला आहे.

आणखी वाचा- “त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलवलं अन्…” कास्टिंग काऊचबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी केला देव आनंद यांचा उल्लेख

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या टॉक शोमध्ये नोरा फतेहीने तिच्या ब्रेकअपनंतरच्या आयुष्याचा खुलासा केला आहे. ब्रेकअपनंतर ती २ महिने डिप्रेशनचा सामना करत होती असंही तिने सांगितलं. नोरा म्हणाली, “प्रत्येक मुलगी तिच्या आयुष्यात किमान एकदा तरी ब्रेकअपच्या अनुभवातून जात असते. माझ्यासाठी हे थोडं कठीण होतं. मी पूर्णपणे तुटले होते. पण खरं सांगायचं तर या अनुभवाने मला पूर्णपणे बदलून टाकलं.”

नोरा फतेही पुढे म्हणाली, “या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी जास्तीत जास्त कामात व्यग्र राहू लागले आणि कामावर लक्ष केंद्रित करू लागले. पण जेव्हा एकदा मी ऑडिशनसाठी गेले असता अचानक रडू लागले. मी त्यावेळी २०० ते ३०० लोकांसमोर ऑडिशन दिली होती आणि त्यावेळी मला वाटलं की, माझ्यासारखे हजारो लोक आहे आहेत. ज्याच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. तेव्हा मी स्वतःला म्हटलं, नोरा उठ, तुला यशस्वी होण्याची भूक नाही का? त्यावेळी मला माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi open up about her breakup and depression after it mrj