बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. बॉलीवूडशिवाय नोराने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ गाण्यामुळे नोराला प्रचंड पसंती मिळाली. परंतु त्यापूर्वीचा तिचा प्रवास सोपा नव्हता, अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने बॉलीवूडमधील पीआरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “…आणि शूटिंगला सुरुवात झाली”, प्राजक्ता माळीने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “आतुरतेने वाट…”

नोरा फतेही झूम डिजिटलशी संवाद साधताना म्हणाली, “मला अनेकांनी हाच सल्ला दिला होता की, तुला पीआरसाठी काही विशिष्ट लोकांना डेट करावे लागेल. फक्त बॉलीवूड पीआर म्हणून प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट कर… पण, मी कोणाचेही न ऐकता मला योग्य वाटेल तो निर्णय घेतला याचा मला प्रचंड आनंद आहे.”

हेही वाचा : धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर ‘रॉकी और रानी’च्या लेखिकेने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “तो सीन…”

नोरा पुढे म्हणाली, “मी नेहमीच माझ्या मनाचे ऐकल्यामुळे आज मला स्वत:च्या मनाप्रमाणे काम करता येत आहे. इतर कोणत्याही व्यक्तीमुळे किंवा विशिष्ट अभिनेत्यामुळे मला यश मिळालेले नाही.” अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही जणांनी तिचे समर्थन केले आहे, तर काही लोकांनी सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नाव आल्याने नोराला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : “२० ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजार…”, अशोक सराफ यांनी सुरु केला नवा उपक्रम; म्हणाले, “माझ्या कुटुंबाकडून…”

दरम्यान, नोरा फतेही सध्या नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाबरोबर ‘हिप हॉप इंडिया’ या डान्स सीरिजसाठी शूटिंग करत आहे. तसेच कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ या चित्रपटात नोरा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi reveals she was asked to date specific actors for bollywood pr sva 00