बॉलिवूडची हॉट अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. पण एका इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. अलीकडेच, ती एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती आणि त्यासाठी तिने पांढरा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसच्या स्लीव्ह्जमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
नोरा फतेहीने तिच्या ड्रेसने लक्ष वेधून घेतले. ‘साकी-साकी गर्ल’ने या कार्यक्रमासाठी मॅमथ स्लीव्हज असलेला पांढरा गाऊन निवडला. नेहमीप्रमाणे, तिने हा पोशाख खूप आत्मविश्वासाने घेतला आणि पापाराझींसाठी पोज देत होती. तिच्या ड्रेसचा ट्रेल दोन लोकांनी धरला होता. पण एकंदरीतच नेटकऱ्यांना तिचा हा ड्रेस फारसा आवडला नाही. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केलंय.
“एअरबॅग्स घालून कुठे निघालीस?” असा प्रश्न एकाने नोराला विचारला. तर, एकाने तिच्या ड्रेसची तुलना चादरीशी केली. काहींनी तिला यात तुझे ३-४ ड्रेस बनले असते इतका कापड वाया घालवलास, असंही म्हटलं. नोराच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.