अभिनेता सोनू सूदने चित्रपटसृष्टी आपल्या दमदार अभिनयातून नाव कमावंल आहेच पण त्याच बरोबर करोना काळात लॉकडाऊन सुरू असताना गरीब आणि गरजूंना मदत केल्यामुळे तो सतत चर्चेत होता. या संपूर्ण काळात त्याने चाहत्यांच्या मनात स्वतःची खास जागा तयार केली आहे. सगळीकडे त्याचं कौतुकही झालं होतं. पण अलिकडेच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरून रेल्वे व्यवस्थापनाने सोनू सूदला सक्त ताकीद दिली आहे.
सोनू सूदने करोनाच्या नंतरही लोकांची मदत केली होती. त्याच कारणाने तो अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो चालत्या ट्रेनच्या दरवाजात बसून प्रवास करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि चाहत्यांनी ट्रेनमधून सामान्य लोकांप्रमाणेच प्रवास केलेल्या सानू सूदचं कौतुक केलं होतं. पण त्याच्या या व्हिडीओवर उत्तर रेल्वेने आक्षेप घेतला आहे.
आणखी वाचा- Video: सोनू सूदला स्टंट नडला, धावत्या ट्रेनच्या दारात बसला तितक्यात…चाहत्यांनी केली कारवाईची मागणी
सोनू सूदच्या एका व्हिडीओवर आक्षेप घेत उत्तर रेल्वेच्या अधिकृत ट्वीटर पेजवरून ट्वीट करण्यात आलं आहे. त्यांनी लिहिलं, “प्रिय सोनू सूद तुम्ही देश आणि जगातल्या लाखो लोकांसाठी एक आदर्श आहात. ट्रेनच्या दरवाजात उभं राहून अशाप्रकारे प्रवास करण धोकादायक आहे. त्यामुळे अशाप्रकारे व्हिडीओ तुमच्या चाहत्यांसाठी चुकीचा संदेश देत आहे. कृपया असं करू नका, सुरक्षित यात्रेचा आनंद घ्या.”
सोनू सूदने अशाप्रकारे ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर मुंबई रेल्वेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोनूच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, GRP मुंबई रेल्वेने लिहिले, “फूट बोर्डवर प्रवास करणे हे चित्रपटांमध्ये ‘मनोरंजन’चे साधन असू शकते, परंतु खऱ्या आयुष्यात नाही! सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया आणि सर्वांना ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ शुभेच्छा देऊया.”