बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. दीपिका चाहत्यांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. दीपिका तिचा प्रेग्नेन्सीचा प्रवास खूप एन्जॉय करत असली तरी तिने तिच्या कामाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. अशातच माहितीनुसार आता दीपिका पदुकोण २०२४मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
IMDb च्या मदतीने फोर्ब्सने संकलित केलेल्या यादीनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी १५ ते ३० कोटी रुपये आकारते. यानुसार, दीपिका सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरते. तसंच दीपिकानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत या एका सिनेमासाठी १५ ते २७ कोटींचं मानधन आकारतात अशी माहिती या यादीत आहे.
हेही वाचा… “शाळेतल्या एका मुलीसाठी…”, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध गायकाने सोडलं होतं घर, म्हणाला, “मी तिच्याकडे गेलो…”
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जी १५ ते २५ कोटी रुपये आकारते. तसंच कतरिना कैफ हीदेखील एका चित्रपटामागे १५ ते २५ कोटी रुपये इतक मानधन आकारते.
आश्चर्याची बाब म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. माहितीनुसार, आलिया एका चित्रपटासाठी १० ते २० कोटी रुपये आकारते. या यादीत समाविष्ट असलेल्या अभिनेत्रींमध्ये करीना कपूर खान ८ ते १८ कोटी रुपये, तर श्रद्धा कपूर (७ ते १५ कोटी रुपये) आणि विद्या बालन ८ ते १४ कोटी रुपये शुल्क आकारते.
या यादीच्या शेवटी अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन या अभिनेत्री आहेत ज्या अनुक्रमे ८ ते १२ कोटी आणि १० कोटी रुपये मानधन आकारतात.
दरम्यान, गेल्या वर्षी दीपिकाचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले होते. यावर्षी दीपिका रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’च्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर साउथ स्टार प्रभास आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘कल्की २८९८ एडी ‘ या चित्रपटातदेखील दीपिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.