आलिया भट्ट व रणबीर कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते आईबाबा झाले. आलिया-रणबीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने कपूर कुटुंबीय आनंदी आहेत. राहा असं त्यांनी लेकीचं नाव ठेवलं आहे. आलिया-रणीबरची मुलगीही इतर स्टारकिड्सप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आता एका अंकशास्र तज्ञाने राहच्या करिअरबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

बॉलिवूड लाइफने राहाचे भविष्य जाणून घेण्यासाठी अंकशास्र तज्ञ नवनिधी बधवा यांना संपर्क साधला. नवनिधी बधवा यांनी आलिया-रणबीरच्या लेकीच्या भविष्याबाबत गुपित उघडं केलं आहे. राहा आलिया-रणबीरसाठी भाग्यवान असल्याचं नवनिधी यांचं म्हणणं आहे. लेकीच्या आगमनाने आलिया-रणबीरचं भवितव्य उजळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about why didn't choose acting field
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”

हेही वाचा>>“साताऱ्याच्या वाघाने…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच किरण मानेंनी शेअर केलेला फोटो चर्चेत

हेही वाचा>>“आदिलला प्रसिद्धी मिळाल्यावर…”, राखी सावंतच्या लग्नाबाबत वकिलाची प्रतिक्रिया

अंकशास्रानुसार, राहाचं मूलांक सहा आहे. सहा या अंकाला अंकशास्रात विशेष महत्त्व आहे. राहा बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होईल. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ती कृती करण्याला अधिक महत्त्व देईल, असंही नवनिधी यांनी सांगितलं आहे.

हेही पाहा>> Photos: खणाचा ड्रेस अन् हलव्याचे दागिने, मकर संक्रांतीसाठी ‘परी’चा खास लूक

राहाच्या करिअरबाबतही नवनिधी यांनी भविष्य वर्तवविलं आहे. राहा रणबीर व आलियाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये राहा उत्तम करिअर करेल, असंही भविष्य नवनिधी यांनी वर्तवविलं आहे. आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर सात महिन्यातच त्यांनी आईबाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.

Story img Loader