Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान हिने मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी २०२४ मध्ये लग्न केलं. आयरा व नुपूर यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नुपूरने आयराला हटके शुभेच्छा दिल्या. नुपूरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांसह चाहत्यांनाही हसू अनावर झालं.
नुपूर शिखरे व आयरा खान यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी उदयपूरमध्ये कुटुंबीय व मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं असून नुपूरने मराठी गाण्यावर हटके रील बनवत बायकोला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नुपूरने आयरासाठी लिहिलेलं कॅप्शनदेखील चर्चेत आहे.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
नुपूरने ‘आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी’ या गाण्यावर रील केलं आहे. नुपूर शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन आयराबरोबर फोटो काढतो, असं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “माझ्याशी लग्न करायचं धाडस दाखवण्यासाठी आणि एक अख्ख वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, मी माझी मिसेस सौ आयरा खान हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करतो”, असं कॅप्शन नुपूरने व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?
पाहा व्हिडीओ –
नुपूरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते व कलाकार लाइक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर, श्रेया धन्वंतरी, सिद्धार्थ मेनन, झेनमेरी, कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर, सायली मराठेसह अनेकांनी हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. तसेच दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
नुपूर व आयरा खानबद्दल बोलायचं झाल्यास दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. तर आयरा खान ही मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करते व एक एनजीओ चालवते. आयरा ही आमिर व त्याची पहिली बायको रीना दत्ता यांची मुलगी आहे.