आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा लग्नसोहळा मुंबईत ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने पार पडला होता. यानंतर या जोडप्याने १० जानेवारीला राजस्थानमध्ये जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. आयरा-नुपूरच्या लग्नातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयरा-नुपूरच्या लग्नाच्या वरातीमधील असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये शिखरे कुटुंबीय एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी आयराच्या सासूबाईंनी विशेष लक्ष वेधून घेतलं. “मुलाची बहीण कुठे आहे?” असा प्रश्न पापाराझींनी विचारताच प्रीतम शिखरे यांनी लगेच गर्दीतून मराठी अभिनेत्री मिथिला पालकरचा हात धरून तिला पुढे बोलावलं.
हेही वाचा : “Happy Birthday नवरोबा!” प्रार्थना बेहेरेची पती अभिषेक जावकरसाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली…
लग्नाच्या वरातीमध्ये प्रीतम शिखरेंनी सगळ्यांसमोर मिथिला पालकरची ओळख नुपूरची बहीण अशी करून दिली. गेल्या अनेक वर्षांपासून नुपूर शिखरे मिथिलाचा जिम ट्रेनर असून तो अभिनेत्रीला बहीण मानतो. त्यांच्या दोघांचे जिममध्ये वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. नुपूर शिखरे मिथिलाला बहीण मानत असल्याने नात्याने ती आयरा खानची नणंद लागते.
हेही वाचा : ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता झळकणार ‘धर्मवीर २’मध्ये, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला…
दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरेबद्दल सांगायचं झालं, तर हे दोघेही २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०२२मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून अनेक सेलिब्रिटी मंडळींना ट्रेनिंग देतो. इटलीमध्ये झालेल्या ‘आयर्न मॅन- इटली’ स्पर्धेत नुपूर सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान त्याने सगळ्यांसमोर आयराला प्रपोज केलं होतं.