आमिर खानची मुलगी आयरा खानचं मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्याशी लग्न झालं आहे. ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने मुंबईत दोघांचं लग्न झालं, त्यानंतर १० जानेवारी २०२४ रोजी त्यांनी उदयपूरमध्ये कुटुंबीय व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. १३ जानेवारीला त्यांचा रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला.

आयरा व नुपूर यांच्या लग्नात नुपूरच्या आई प्रितम शिखरे यांच्या साधेपणाने लक्ष वेधून घेतलं. प्रितमजी या आपल्या कुटुंबाचा भाग असल्याचं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता. त्यानंतर लग्नातही नुपूरच्या आईची खान कुटुंबाशी असलेली जवळीक पाहायला मिळाली. आता प्रितम शिखरे यांनी मुलाच्या लग्नाबद्दल पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सून आयरा खानचं कुटुंबात स्वागत केलं आहे.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

‘नवराई माझी लाडाची लाडाची गं,’ या गाण्यावर प्रितम शिखरे यांनी डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. “आयरा खान तू आमच्या आयुष्यात आलीस याचा मला खूप आनंद झाला आहे,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

प्रितम शिखरे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर त्यांचा मुलगा नुपूरने रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर इतरही जणांनी कमेंट्स करत प्रितम शिखरे यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. तसेच मुलाच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader