फिटनेस ट्रेनर व आमिर खानचा मराठमोळा जावई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर फिटनेसबद्दल व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याने इन्स्टाग्रामवर आज शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याच्याबरोबर त्याची आई प्रितम शिखरेदेखील आहेत.

नुपूर व प्रितम यांचा हा व्हिडीओ फार चर्चेत आहे. यात प्रितम नुपूरला झाडूने मारताना दिसतात, हा व्हिडीओ गमतीशीर आहे. याला नुपूरने ‘आईचे फटके’ असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओत प्रितम नुपूरला विचारतात, ‘काय रे काय करतोयस’, त्यावर नुपूर ‘हिलींग करतोय’ असं उत्तर देतो. ‘कामावर जायचं नाही का?’ असं आईने विचारल्यावर नुपूर म्हणतो, ‘नाही. काम आजपासून सोडलं आता मी हिलींग करणार’. त्यानंतर प्रितम किचनमधून झाडू घेऊन येतात, ते पाहताच नुपूर ‘जातो, जातो’ म्हणत दारातून बाहेर पडतो. त्यानंतर ‘एवढा मोठा घोडा झालाय आणि कामं सोडून हिलींग करतो,’ असं प्रितम म्हणताना दिसतात.

“ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”

नुपूर व त्याची आई प्रितम यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते हसणाऱ्या इमोजी कमेंट करत आहेत. ‘आईने झाडू फिरवला असता तर हिलींग पूर्ण झाली असती’ अशी कमेंट एकाने केली आहे.

Story img Loader