Ira Khan and Nupur Shikhare Reception : आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे. आयरा खान व नुपूर शिखरेचं मुंबईत ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झालं. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यावर १० जानेवारी रोजी आयरा-नुपूर राजस्थानमधील उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर या जोडप्याने बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईत नुकतंच रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.

या रिसेप्शन पार्टीत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, रेखा, हेमा मालिनी, जॅकी श्रॉफ, मुमताज, सायरा बानो, जया बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला काही राजकीय नेते देखील उपस्थित होते. या शाही विवाहसोहळ्यानंतर आयराचा पती नुपूर शिखरेने आयरासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

हेही वाचा : “आम्हाला लग्न करायचं नव्हतं, पण…”, ‘अशी’ आहे आशुतोष राणा व रेणुका शहाणेंची फिल्मी लव्हस्टोरी, अभिनेते म्हणाले…

नुपूर शिखरेने रिसेप्शन पार्टीतील आयराबरोबरचे काही खास फोटो शेअर करत त्याला “मला तुझ्याबरोबर खूप वेळा लग्न करायचंय बब्स” असं रोमँटिक कॅप्शन त्याने दिलं आहे. नुपूर शिखरेच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे?” जुई गडकरीने लग्नाबद्दल मांडलं मत; नेटकऱ्याला म्हणाली, “कळेल हा…”

दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर आता आयरा-नुपूर लग्नबंधनात अडकले आहेत. नुपूर शिखरेबद्दल सांगायचं झालं, तर तो एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून अनेक सेलिब्रिटी मंडळींना ट्रेनिंग देतो.

Story img Loader