आमिर खानचा मराठमोळा जावई व लोकप्रिय सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अनेकदा तो मजेशीर रील बनवून पोस्ट करतो. बऱ्याचदा त्याच्या रीलमध्ये त्याची आई प्रीतम शिखरेदेखील असतात. या माय- लेकाचे व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडतात. आता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुपूर व प्रीतम यांचा हा व्हिडीओ पाहून मराठी सेलिब्रिटींसह सुश्मिता सेनलाही हसू आवरलं नाही. त्यांच्या व्हिडीओवर चाहतेही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहे. पती अन् सासूबाईंचा हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यावर आयरानेही कमेंट केली. सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला नुपूर व प्रीतम शिखरे यांचा हा व्हिडीओ नेमका कशाबद्दल आहे ते पाहुयात.

“माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट; म्हणाली, “माझा सावत्र भाऊ…”

सध्या ‘माझ्याशी नीट बोलायचं’ हे मराठी गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर मजेशीर रील बनवताना दिसत आहेत. याच गाण्यावर नुपूर अन् त्याच्या आईने व्हिडीओ बनवला आहे. यात प्रीतम यांचा ‘निवांत’ व ‘कूल’ अंदाज पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नुपूर मात्र घरातली कामं करताना दिसतोय. नुपूर आईला चहा देताना, घर झाडताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. ‘आईशी नीटंच बोलायचं!’ असं कॅप्शन या व्हिडीओला दिलंय.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

पती नुपूर व सासूबाई प्रीतम यांचा व्हिडीओ पाहिल्यावर आयराने ‘ओह माय गॉड, हे खूप चांगलंय’ अशी कमेंट केली आहे. तर, हा व्हिडीओ पहिल्यावर सुश्मिताला हसू आवरलं नाही. तिने हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. प्रिया बापटने ‘भारी’ अशी कमेंट केली. याशिवाय मिथिला पालकर, मेघा धाडे व फातिमा सना शेख यांनीही हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत. नुपूर व प्रीतम यांचा हा ट्रेडिंग गाण्यावरचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

नुपूर शिखरेच्या व्हिडीओवरील कमेंट्स

फक्त सेलिब्रिटीच नाही तर चाहतेही या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘प्रीतम आंटी रॉकस्टार आहेत,’ ‘स्वॅग’, ‘बेस्ट रील’, ‘खूप मस्त’, ‘आई आणि दादा एकदम मस्त’, ‘लय भारी’, ‘एक नंबर’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

दरम्यान, नुपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आमिर खानची लेक आयराशी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nupur shikhare trending reel with mother ira khan sushmita sen reacts see viral video hrc