आमिर खानची मुलगी आयरा खान लग्नबंधनात अडकली आहे. बुधवारी (३ जानेवारी २०२३ रोजी ) तिने नोंदणी पद्धतीने नुपूर शिखरेशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ जोरदार चर्चेत आहेत. खरं तर नुपूरची वरात फारच हटके होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुपूर बनियन व शॉर्ट्सवर घरातून आठ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यानंतर त्याने ढोल वाजवत वरातीमधील पाहुण्यांबरोबर डान्स केला. आयरा व नुपूर यांच्या लग्नाचे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यानुसार नुपूरने शॉर्ट्स व बनियनवरच लग्न केलं. तर आयराने धोती स्टाइल पँट व चोली परिधान केली होती. याबरोबरच तिने नेकलेस घातला होता आणि साध्या मेकअपने तिचा लूक पूर्ण केला होता.

Videos: आयरा खान व नुपूर शिखरे यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न, मुकेश अंबानींनी पत्नीसह लावली हजेरी, व्हिडीओ आले समोर

दरम्यान, नुपूरचा लग्नातील हा लूक मात्र नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यांनी नुपूरला ट्रोल केलं आहे. ‘काहीतरी वेगळं करायचं होतं, ते ठिक आहे पण असं नव्हतं करायचं’, ‘याने असे कपडे का घातले आहेत, मुलगा कितीही चांगला असला तरी स्वतःच्या लग्नात कोणते कपडे घालावे एवढं तरी त्याला कळायला हवं होतं’, ‘याने खरंच बनियनवर लग्न केलंय,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नुपूर शिखरेच्या व्हिडीओवरील कमेंट्स

‘चला थोडे पैसे गोळा करून नवरदेवासाठी शेरवानी घेऊयात’, ‘तो मित्रांबरोबर धावत लग्नस्थळी पोहोचला, ही वरात खरंच वेगळी आहे, पण आवडली नाही’, ‘शेरवानीचे पैसे वाचले,’ ‘नवरदेव झोपून होता, तयार व्हायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे स्वतःच्या लग्नात तो असा पोहोचला’, ‘अरे हे तुझं लग्न आहे पजामा पार्टी नाही’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नुपूर शिखरेच्या व्हिडीओवरील कमेंट्स

‘मी व्हिडीओत नवरदेवाला शोधता शोधता थकून गेले, नंतर लक्षात आलं की बनियनमध्ये बसलेला नवरदेव आहे’, ‘बुटांऐवजी कपडे कोणी चोरले,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नुपूर शिखरेच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, नुपूरने नंतर रिसेप्शनसाठी कपडे बदलले होते. नुपूर व आयराच्या लग्नाला मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nupur shikhare trolled as he wore shorts and baniyan in wedding with ira khan hrc