बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आली. अलीकडेच ती रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसली होती. ‘ड्रीम गर्ल’ मधील तिच्या अभिनयासाठी नुसरतचे खूप कौतुक झाले होते, मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तिची जागा अनन्या पांडेने घेतली होती. ‘ड्रीम गर्ल २’ मधून पत्ता केल्यानंतर नुसरतने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “ती आई बनलीय हेच…”; आलिया भट्टबाबतच्या ‘त्या’ विधानानंतर शाहिद कपूरवर नेटकरी भडकले, म्हणाले, “तुझी बायको…”

आयुष्मान खुराना स्टार ‘ड्रीम गर्ल’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात आयुष्यमानबरोबर नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत होती. चाहते आता या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलमधून नुसरतला वगळण्यात आलं असून तिच्या जागी अनन्या पांडेला मुख्य भूमिका देण्यात आली आहे. ‘ड्रीम गर्ल २’चा भाग का बनली नाही? असा प्रश्न नुकत्याच एका मुलाखतीत नुसरत भरुचाला विचारण्यात आला होता. यावर अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला हा प्रश्न चित्रपट निर्मात्याला विचारायला हवा. त्यांनी मला त्यात का घेतले नाही हे त्याला विचारण्याची माझी मनापासून इच्छा नव्हती. मी त्याला याबाबत कोणताच प्रश्न विचारला नाही. मला वाटले की त्यांनी मला या चित्रपटाबाबत विचारले नाही तर ठीक आहे. मी सगळ्या गोष्टी स्वीकार करणारी बनली आहे. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टींच टेन्शन नाहीये.”

हेही वाचा- “मी तुझं…” ; ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

नुसरत भरुचाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘छोरी २’ मध्ये दिसणार आहे, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. नुसरतकडे आणखी एक मोठा प्रोजेक्ट आहे, ज्याचा तिने अद्याप खुलासा केलेला नाही.