‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांपासून अभिनेत्री नुसरत भरुचा प्रसिद्धीझोतात आली. पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारून तिने बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच नुसरत ‘अकेली’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात युद्धग्रस्त इराकमध्ये अडकलेल्या एका भारतीय मुलीची कहाणी दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अलीकडेच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या वेळी अभिनेत्रीने तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाविषयी सांगितलं.
हेही वाचा : “मला अभिनेता म्हणून माझ्याच कंपनीत काम मिळत नाही”; करण जोहरने व्यक्त केली खंत
नुसरत भरुचाने २००६ मध्ये जय संतोषी मॉं या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ‘लव्ह सेक्स और धोका’ या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे बॉलीवूडमध्ये तिची ओळख निर्माण झाली. मात्र, २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटामुळे अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “आता मी कोणत्याही चित्रपटात बिकिनी वगैरे घालू शकते. परंतु, ‘प्यार का पंचनामा’मध्ये बिकिनी घालण्यासाठी मी दिग्दर्शकाला नकार कळवला होता. आम्हा तीन अभिनेत्रींना बीचवर संपूर्ण सीन शूट करायचा होता. त्यात तुम्हाला मी एकटीच स्कर्ट घालून दिसली असेन. मी पूर्ण बिकिनी घातली नव्हती.”
नुसरत पुढे म्हणाली, “बिकीनी घालण्यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती. मला अवघडल्यासारखं वाटतं होतं… मी आजवर केव्हाच बिकिनी घातली नसल्याने माझी शारीरिक आणि मानसिक तयारी नाही. असं मी आमच्या दिग्दर्शकांना सांगितलं होतं. त्यावेळी सगळंच माझ्यासाठी नवीन होतं म्हणूनच मी ‘प्यार का पंचनामा’च्या पहिल्या भागात बिकिनी घातली नव्हती.”
हेही वाचा : ‘क्लास’ वेबसीरिजमधील ‘तो’ न्यूड सीन कसा शूट केला? इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्नाने सांगितला किस्सा
२०११ मध्ये पहिला भाग आला होता त्यानंतर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा २’या दुसऱ्या भागात मी बिकिनी घातल्याचे तुम्हाला दिसेल. मी त्या पाच वर्षांमध्ये खूप बदल केला. चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात मी बिकिनी घालण्यास सुरुवात केली. यामुळे माझ्यात आत्मविश्वास, शारीरिक सकारात्मकता निर्माण झाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं नुसरतने सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असलेला ‘अकेली’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.