अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. बऱ्याचदा तिला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं. आता नुकतेच तिच्या न्यू इअर पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत न्यासाचा लूक बघून पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

न्यासाच्या दिसण्यामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक मोठा बदल झाला आहे. तिचा हा बदललेला लूक म्हणजे सर्वांसाठीच सरप्राईज होतं. तर सध्या अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा दुबईत आहे. दुबईत राहून तिने नवीन वर्षाचे स्वागत केले. या खास प्रसंगी ती तिच्या मित्रांसोबत खूप एन्जॉय करताना दिसली. न्यासाचा मित्र ओरहान आणि न्यासाच्या फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंमध्ये न्यासाचा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’ प्रेक्षकांना भावलं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी कमावत चित्रपटाची कौतुकास्पद कामगिरी

नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान न्यासाने काळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता. न्यासाच्या या बोल्ड लूकवर तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, अनेकांना तिचा हा बोल्ड अंदाज आवडला नाही आणि त्यांनी तिच्यावर टिका करायला सुरुवात केली.

हेही वाचा : “लोक वाईट बोलतात याचा अर्थ न्यासा…”; लेकीला ट्रोल केलं जाण्याबद्दल काजोलने सोडलं मौन

या फोटोंवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “या अशा पोज देऊन फोटो काढल्यानंतर ती तिच्या आई-वडिलांच्या नजरेला नजर कशी मिळवू शकते हेच कळत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तिने तिच्या आई-वडिलांची अब्रू पार धुळीला मिळवली आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ही १ टक्काही तिच्या आईसारखी नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “ही पूर्णपणे नशेत आहे.” न्यासाचे न्यू इअर पार्टीचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Story img Loader