बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी निसा देवगण ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. अजय आणि काजोलची लेक निसा हिने नुकतंच तिचा वाढदिवस साजरा केला. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर निसाचे वय ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निसा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना पाहायला मिळते. सध्या निसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती केक कापताना दिसत आहे. यात ती केकवर लावलेल्या मेणबत्ती विझवताना दिसत आहे. केक कापल्यानंतर तिचे कुटुंबिय ‘हॅप्पी बर्थडे टू यू’ असे गाणे गाताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

यावेळी अनेक नेटकऱ्यांनी तिच्या वाढदिवसाच्या केकवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तिचा वाढदिवसाचा केक हा २० आकडा लिहिलेला होता. तो पाहून अनेकांना निसाचं वय नेमकं काय असा प्रश्न पडला. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत तिचं वय विचारलं आहे.

‘निसा ही फक्त २० वयाची आहे, मला वाटलं ती २५-२६ वर्षांची असेल’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘२०??? पण ती दिसायला २५ वयाची वाटते’, असे म्हटले आहे. ‘ही २० ची आहे’, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : Video : “तू दूर का, अशी तू दूर का…” भर नाटकादरम्यान ओंकार भोजनेने म्हटली कविता, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान काजोल आणि अजयचे लग्न हे २० फेब्रुवारी १९९९ मध्ये झाले. त्या दोघांनाही दोन मुलं आहेत. निसाचा जन्म २० एप्रिल २००३ मध्ये झाला. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १३ सप्टेंबर २०१० मध्ये युगचा जन्म झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nysa devgan birthday video ajay devgan and kajol daughter turns 20 celebrates by cutting cake video nrp