अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. पण कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी तिच्या वागण्यामुळे तिला ट्रोल केलं जातं. आता नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी तिने काजोलबरोबर केलेल्या वागणुकीमुळे नेटकरी तिच्यावर नाराज झाले आहेत.
गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटनाला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच स्टार्सनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमांमध्ये काजोल व न्यासा देखील आल्या होत्या. त्या वेळचा न्यासा आणि काजोलचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : Video: काजोल आणि तनिषाने मिळून आईला भेट दिला आलिशान बंगला, झलक पाहून व्हाल आवाक्
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी न्यासा देवगणही आई काजोलसोबत तिथे पोहोचली होती. यादरम्यान या माय लेकींनी पापाराझींसमोर पोज दिल्या. काही वेळ पोच दिल्यानंतर त्या दोघी तिथून निघू लागल्या. इतक्यात फोटोग्राफर्सनी न्यासाकडे सोलो फोटोची मागणी केली. तर काजोलने देखील न्यासाला तू त्यांना सोलो फोटो दे असं तिला सांगितलं. पण न्यासाने काजोलचं न ऐकता तिला थेट नकार दिला आणि तिथून निघून गेली.
न्यासाने काजोलचे देखील म्हणणं ऐकलं नाही हे पाहून नेटकरी तिच्यावर नाराज झाले आहेत. एकाने लिहिलं, “ही दरवेळी आईला मान खाली घालायला लावते.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “आजच्या पिढीला पालकांसोबत फोटो काढण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो.”आणखी एकाने लिहिलं, ” आजकालची मुलं सर्वांसमोर आपल्या पालकांचा अपमान करतात.” त्यामुळे अजय आणि काजोलची लेक न्यासा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.