अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेक इव्हेंट्स व बॉलिवूड पार्टीना हजेरी लावत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक न्यासाचा व्हिडीओ अलीकडेच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत न्यासा कारमधून खाली उतरताना दिसत आहे. पण, कारचा दरवाजा उघडताच तिचं डोकं कारच्या वरच्या भागाला आदळतं. नंतर न्यासा कारमधून उतरून निघून जाते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत. ‘ही नेहमी नशेतच असते’, ‘न्यासा नेहमी धडपडत असते’, ‘बिचारीला खूप जोरात लागलं’, ‘ही मेक अपने अंघोळ करून येते की काय’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, न्यासा ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही अनेकदा तिला तिच्या लूकमुळे ट्रोल केलं गेलं होतं.