अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण अनेकदा तिच्या सुट्टीतील आणि पार्टीतील लूक तसेच फोटो व व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ही स्टार किड सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथला तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: पुन्हा धडपडली न्यासा देवगण; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अजय-काजोलच्या लेकीला केलं ट्रोल, म्हणाले “बिचारी…”

न्यासा अलीकडेच ग्रामीण अहमदनगरमधील वंचित विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. अजयच्या एनवाय फाऊंडेशनने एका संस्थेशी करार केला आहे, जी भारतातील २०० हून अधिक गावांमध्ये सक्रिय आहे. त्याअंतर्गत एके ठिकाणी न्यासाने डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना पुस्तकं व स्पोर्ट्स किटचं वाटप केलं. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये न्यासा पिवळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत होती. यावेळी तिने मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढले.

न्यासाने यावेळी शिक्षण आणि पुस्तके वाचण्याचे महत्त्वही सांगितले. मात्र, न्यासा बोलत असताना अडखळताना दिसील. तिने हिंदीत भाषण केले. ती म्हणाली, “मला वाचायला खूप आवडते. मी रोज २-३ पुस्तके वाचायचे. तुम्ही पण पुस्तकं वाचत जा.” न्यासा हिंदी बोलताना अडखळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

न्यासा अजूनही स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या करिअर प्लॅन्सबद्दल बोलताना, अजयने ती चित्रपटांमध्ये येईल की नाही, हा तिचा निर्णय असेल असं सांगितलं होतं.