बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘आदिपुरुष’च्या बाबतीत जी चूक घडली तशी चूक यावेळी घडू नये यासाठी सेन्सॉर बोर्डाने अधिक दक्षता घेतली. ‘ओह माय गॉड २’मध्ये तब्बल २७ बदल सुचवल्याचं ऐकिवात होतं, याबरोबरच चित्रपटाला मिळालेलं ‘ए सर्टिफिकेट’ यामुळेसुद्धा बऱ्याच लोकांचा हिरोमोड झाला. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट लहान मुलांना अवश्य दाखवायला पाहीजे अशा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.
चित्रपटातील कलाकारही सेन्सॉर बोर्डच्या या निर्णयावर भाष्य करताना दिसत आहेत. मध्यंतरी अक्षय कुमारने सेन्सॉरच्या या निर्णयावर टीका केली. आता पाठोपाठ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणारे अभिनेते गोविंद नामदेव यांनीही याबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटावरही गोविंद यांनी टीका केली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये गोविंद नामदेव लिहितात, “ओह माय गॉड २ हा चित्रपट अखेर २४ कट्स आणि ए सर्टिफिकेटसह प्रदर्शित झाला. ज्या पौगंडावस्थेतील मुलांसाठी हा चित्रपट बनवला आहे त्यांनाच तो आता पाहता येणार नाही. आदिपुरुषसारख्या टुकार चित्रपटाला सर्टिफिकेट देताना सेन्सॉर बोर्डने जे डोकं वापरायला हवं होतं त्या ऐवजी ‘ओएमजी २’सारख्या वैचारिक चित्रपटाला बदल सुचवण्यात आणि ए सर्टिफिकेट देण्यात यांनी बुद्धी खर्ची केली.”
पुढे ते म्हणाले, “आत्तासुद्धा वेळ आहे बोर्डाने त्यांचा निर्णय मागे घेऊन त्याला युए सर्टिफिकेट द्यायला हवं. आज प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद बघता हा बदल करायला नक्कीच हरकत नाही. यासाठी प्रेक्षकांचे आभार मानायलाच हवेत.” या चित्रपटात लैंगिक शिक्षण आणि हस्तमैथुनसारख्या गंभीर विषयांवर यातून भाष्य करण्यात आलं आहे. यात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.