बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून याने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची कमाईही केली आहे.

हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘आदिपुरुष’च्या बाबतीत जी चूक घडली तशी चूक यावेळी घडू नये यासाठी सेन्सॉर बोर्डाने अधिक दक्षता घेतली. ‘ओह माय गॉड २’मध्ये तब्बल २७ बदल सुचवल्याचं ऐकिवात होतं, याबरोबरच चित्रपटाला मिळालेलं ‘ए सर्टिफिकेट’ यामुळेसुद्धा बऱ्याच लोकांचा हिरोमोड झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट लहान मुलांना अवश्य दाखवायला पाहीजे अशा प्रतिक्रिया समोर आल्या.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

आणखी वाचा : फळविक्रेता ते एका रात्रीत बार डान्सरवर ९० लाख उधळणारा स्कॅमर; कहाणी अब्दुल करीम तेलगीची

इतकंच नव्हे तर अक्षय कुमारनेही सेन्सॉर बोर्डच्या या निर्णयावर खेद व्यक्त केला होता. यापाठोपाठ आता चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय यांनीही सीबीएफसी कडे हात जोडून चित्रपटाला युए सर्टिफिकेट देण्याची विनंती केली होती. ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना याबाबत अमित राय म्हणाले, “मला अजूनही चांगलंच आठवतंय की मी अक्षरशः त्यांच्यापुढे या चित्रपटाला युए सर्टिफिकेट मिळण्यासाठी हात जोडले होते. मी त्यांना त्यांचा निर्णय चुकीचा आहे याची जाणीव करून दिली. हा चित्रपट आम्ही ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे बरेच सल्ले आम्हाला मिळाले होते, परंतु तरीही आम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करायचं ठरवलं.

पुढे अमित राय म्हणाले, “मी सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना तब्बल ७० मेसेजेस केले, चित्रपटाचे रिव्यू आल्यानंतरही मी याबद्दल त्यांना सांगितलं पण अद्याप मला त्यावर उत्तर मिळालेलं नाही. मला एकदा भेटायची मी त्यांना विनंती केली पण त्यावरही त्यांनी अजून मौन बाळगलं आहे.

‘ओएमजी २’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सनी देओलचा ‘गदर २’ समोर असूनसुद्धा प्रेक्षकांनी अक्षयच्या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली. लैंगिक शिक्षण आणि हस्तमैथुनसारख्या गंभीर विषयांवर यातून भाष्य करण्यात आलं आहे. यात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader