Om Raut on Adipurush Failure: प्रभास व क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने केले होते. व्हीएफएक्स व संवांदांमुळे या चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाच्या अपयशाबाबत अखेर दिग्दर्शकाने मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओम राऊत म्हणाला की या चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. प्रभास आणि सलमान खानसारखे स्टार्स ‘फ्लॉप-प्रूफ’ आहेत, त्याचे खूप चाहते आहेत. “प्रभास, सलमान सर फ्लॉप प्रूफ आहेत. त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक विशिष्ट समज आहे, त्यांची एक विशिष्ट प्रतिमा आहे, त्यामुळे काही फ्लॉपमुळे त्यांना फरक पडत नाही. कारण शेवटी ते प्रभास व सलमान खान आहेत. लोकांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि ते या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेले आहेत,” असं ओम राऊत अमोल परचुरेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“लैंगिक अत्याचार पाहता येतो, पण किस नाही?” झोया अख्तर सेन्सॉरशीपबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “इंटिमसी पाहण्याची…”

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ओम राऊत म्हणाला…

Adipurush Box Office Collection: चित्रपटाचे बजेट ६०० कोटी होते आणि चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली. चित्रपटाने केलेली ही कमाई चांगली होती, असं ओम राऊतने म्हटलंय. “आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन ७० कोटी रुपये होते. हे कलेक्शन फक्त भारतातले होते. आमचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ४०० कोटींहून जास्त होते. हा आकडा खूप मोठा होता. आदिपुरुषला कलेक्शनच्या बाबतीत नुकसान झालं नाही तर त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी पसरल्या त्यामुळे नुकसान झालं. चित्रपटाबद्दल सकारात्मक बोललं गेलं असतं तर आणि ते नियंत्रणात असतं तर हे आकडे आणखी वाढले असते पण तसं झालं नाही, हेच निराशाजनक होतं,” असं चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल बोलताना ओम राऊत म्हणाला.

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

बॉक्स ऑफिस कलेक्शन महत्त्वाचे

आदिपुरुषवर टीकेची झोड उठली होती, त्यावर विचारल्यावर या गोष्टीने काही फरक पडत नाही. चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन किती केले ते महत्त्वाचे आहे असं ओम राऊत म्हणाला. “चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या, पण तरीही देशभरातील लोकांकडून चित्रपटाचे कौतुक करणारे मेसेज आम्हाला आले होते. या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना तयार केल्या गेल्या, त्यामुळे नुकसान झाले. त्यामागे प्रतिगामी प्रसारमाध्यमं कारणीभूत होती,” असं तो म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om raut breaks silence on adipurush failure says prabhas is flop proof actor hrc