ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. याबरोबरच प्रभासला प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत घेतलेलंही प्रेक्षकांना चांगलंच खटकलं आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान प्रभासला ही भूमिका देण्याबद्दल ओम राऊतने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रभास हा एकमेव अभिनेताच त्याच्या डोळ्यांसमोर असल्याचं ओम राऊतने मान्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या शोदरम्यान लोकांनी चित्रपटगृहात केली तोडफोड; नेमकं कारण आलं समोर

‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम राऊत म्हणाला. “तुम्ही जर पाहिलं तर रामायणातील काहीच भागांवर आम्ही लक्षकेंद्रित केलं आहे. पराक्रमी राम, परमवीर राजाराम आणि युद्धकांड याच गोष्टींवर. प्रभू श्रीराम यांच्यातील परमवीर हा गुण पडद्यावर दाखवू शकणारा कुणी इतर अभिनेता माझ्या डोळ्यासमोरच नव्हता.”

ओम राऊत पुढे म्हणाला, “याचसाठी प्रभास हा एकमेव अभिनेता या भूमिकेसाठी योग्य होता. त्याचं मन फार निर्मळ आहे आणि ते त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसतं. तो एक मोठा स्टार आहे पण तो तितकाच साधा आहे. त्यामुळे जेव्हा मी हा चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा माझ्या डोक्यात फक्त प्रभासचाच विचार आला.” रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ने तीन दिवसांत ३०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात प्रभाससह क्रीती सेनॉन, सैफ अली खान अन् देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.