दिग्दर्शक ओम राऊत हा सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहेत. पहिल्याच टीझरपासून हा चित्रपट चर्चेत आहे. एकंदर या चित्रपटाला बऱ्याच लोकांनी विरोध केला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स, रावणाचे सादरीकरण यामुळे बऱ्याच लोकांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत.
‘आदिपुरुष’चा फायनल ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्चसाठी तिरुपतीमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला या चित्रपटाची टीमही उपस्थित होती. यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये ओम राऊत क्रीती सनॉनला कीस करताना दिसत आहे.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर क्रीती पुन्हा तिच्या गाडीजवळ आली तेव्हा ओम राऊतने तिला आलिंगन दिलं आणि तिच्या गालावर कीस केलं. मंदिराच्या परिसरात असं वर्तन केल्याने सध्या ओम राऊत प्रचंड ट्रोल होत आहे. आंध्रप्रदेशमधील बीजेपी नेते रमेश नायडू यांनी याबद्दल ट्वीट करत आक्षेप नोंदवला आहे.
ओम राऊत आणि क्रीती सनॉन यांना ट्वीटमध्ये टॅग करत त्यांनी लिहिलं की, “इतक्या पवित्र ठिकाणी असं वर्तन कितपत योग्य आहे? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणं आणि कीस करणं हे अपमानकारक आहे.” या ट्वीटमध्ये उत्तरप्रदेशची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही टॅग करत या गोष्टीची दखल घ्यायची विनंती केली आहे. थोड्यावेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केल्याचंही समोर आलं आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.