‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होताच वादात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटावरून पहिल्याच दिवशी वाद सुरू झाला आहे. अशातच दिग्दर्शक ओम राऊतचं वक्तव्य समोर आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “जाणीवपूर्वक लिहिले”, ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या वादग्रस्त संवादावर लेखकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या देशाचे…

या चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्सवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर व दिग्दर्शक ओम राऊत यांनी रिपब्लिक टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुम्ही रामायणची अॅक्शन फिल्म बनवली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ओम राऊत म्हणाला, “रामायण खूप मोठे आहे. त्यामुळे ते कुणालाही समजणे शक्य नाही. जर कुणी म्हणत असेल की त्यांना रामायण समजतं तर ते मुर्ख आहेत किंवा ते खोटं बोलत आहेत.”

“रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”

पुढे ओम राऊत म्हणाला, “आपण जे रामायण याआधी टीव्हीवर पाहिलंय, जे पाहून मी मोठा झालोय, ते खूप मोठ्या स्तरावरचं होतं. आम्ही आदिपुरुषला रामायण म्हणत नाही. आम्ही त्याला आदिपुरुष म्हणतोय कारण तो रामायणमधील एक छोटा भाग आहे. आम्ही यात युद्धकांड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना युद्धकांडमधीलही एक लहानसा भाग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. युद्धकांडमध्ये ते पराक्रमी आणि पराक्रमी राम आहेत.”

हेही वाचा – Photos: “इसके पेट पे बाण मारिए प्रभू”, ‘आदिपुरुष’ पाहिल्यानंतर इंटरनेटवर मीम्सचा पाऊस; तुम्हीही पोट धरून हसाल

दरम्यान, आदिपुरुष चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om raut reaction on adipurush controversy calls people fool who claim to understand ramayana hrc
Show comments