बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ चित्रपट चांगलाच गाजला होता. काल शुक्रवार (११ ऑगस्ट) रोजी या चित्रपटाचा सिक्वेल ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मात्र, अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केल्याचे पहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू फिकी पडलेली दिसून आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- gadar-2 Box Office Collection: ‘गदर २’ ची ग्रँड ओपनिंग! पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

मिळालेल्या माहितीनुसार ‘ओह माय गॉड २’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘ओह माय गॉड २’ बरोबर सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. ‘गदर २’ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४० ते ४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्या तुलनेत अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ ने खूपच कमी केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान ‘ओह माय गॉड २’ चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. , या चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून २० कट सुचवण्यात आले होते. यापूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. रिपोर्ट्सनुसार, ‘जिओ सिनेमा’बरोबर निर्माते डील करत होते. कदाचित ९० कोटींना हा करार होणार होता, पण नंतर अचानक हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा- ‘वेल्कम ३’साठी अक्षय कुमारने घेतलं ‘एवढं’ मानधन; ‘केजीएफ १’ चित्रपटाचं बजेटही पडेल फिकं

‘ओह माय गॉड २’ चित्रपटात अक्षय कुमारबरोबर पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, यामी गौतम या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omg 2 box office collection day 1 akshay kumar pankaj tripathi starrer rs 10 crores dpj