अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ (OMG) चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात अभिनेत्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती आता दुसऱ्या भागात (OMG2) अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा : “माझा संघर्ष संपलेला नाही” अभिनेत्री प्रिया बापटने मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “भविष्यात चित्रपटसृष्टीत…”

‘ओ माय गॉड २’ (OMG2) चित्रपटात आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील मतभेद दाखवण्यात आले आहेत. टीझरमध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा जबरदस्त अंदाज दिसत आहे. चित्रपटात केसांच्या लांब जटा, कपाळाला भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ असा अक्षय कुमारचा लुक असणार आहे. इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत अक्षय कुमारने “रख विश्वास” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर प्रसाद ओकने केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिले पोस्टर आले समोर

‘ओ माय गॉड २’ मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार, अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अमित राय यांनी सांभाळली आहे. पहिल्या भागात परेश रावल यांनी कांजीलाल मेहता हे नास्तिक पात्र साकारले होते. मात्र, दुसऱ्या भागात आस्तिक कांतीशरण मुतकल यांची कथा दाखवण्यात येणार आहे. अक्षय भगवान शंकराची, तर पंकज त्रिपाठी कांतीशरण यांची भूमिकेत दिसतील.

दरम्यान, ‘ओ माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या भागात चित्रपटाच्या जुन्या भागातील स्टारकास्टही दिसणार आहे. या चित्रपटात भगवान प्रभू श्रीरामाची भूमिका रामानंद सागर रामायण फेम अरुण गोविल साकारणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला ‘गदर २’ बरोबर रिलीज होणार आहे.

Story img Loader