OMG 2 Trailer Out Now : अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ (OMG) चित्रपटाच्या सीक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘ओ माय गॉड’चित्रपटाचा सीक्वेल ‘OMG 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘OMG 2’ या चित्रपटाचे संपूर्ण कथानक कांती शरण मुदगल यांच्या कुटुंबावर आधारित आहे हे ३ मिनिटांचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. ट्रेलरमधील अक्षय कुमारच्या शिवअवताराने लोकांची मने जिंकली आहेत. कांती शरण मुदगल यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याला शाळेतून काढून टाकले जाते. यानंतर कांती शरण यांचा मुलगा आत्महत्या करण्यासाठी गेल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याला शाळेतून सुद्धा काढून टाकले जाते. यानंतर कांती शरण देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून थेट न्यायालयात याचिका करतात.
हेही वाचा : “…म्हणून प्रियाशी लग्न केलं”, उमेश कामतने केला मजेशीर खुलासा; म्हणाला, “तिच्यासारखी बायको…”
ट्रेलरमध्ये न्यायालयातील एक सीन विशेष लक्ष वेधून घेतो. यामध्ये न्यायाधीश आरोपी आणि तक्रारदार कोण असा सवाल करतात. यानंतर पंकज त्रिपाठी (कांती शरण) हात वर करून दोन्ही मीच आहे असे उत्तर देतात. त्यामुळे कांती शरणला न्याय मिळणार का? भगवान शिवशंकरांचा दूत असलेला अक्षय कुमार त्यांना कशी मदत करणार? याचा उलगडा चित्रपटगृहात ११ ऑगस्टला होईल असे ट्रेलरमध्ये सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीला वाढदिवशी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) अर्थात सेन्सॉर बोर्डाने OMG 2 ला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठींसह यामी गौतम, गोविंद नामदेव आणि अरुण गोविल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.