Animal Trailer : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

अ‍ॅनिमल या चित्रपटाच्या टीझरमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळत आहे. याबरोबरच नुकतंच या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘हुआ मै’सुद्धा प्रदर्शित झालं. गाण्यातील व्हिडीओमध्ये रणबीर आणि रश्मिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री लोकांना चांगलीच पसंत पडली आहे. या गाण्यातील किसिंग सीनची सुद्धा जबरदस्त चर्चा रंगली आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

आणखी वाचा : आता फक्त ७० रुपयांमध्ये चित्रपट बघा; ‘PVR’ लवकरच घेऊन येणार त्यांचा खास सबस्क्रिप्शन प्लॅन

अशातच आता रणबीरचे चाहते त्याच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘पिंकव्हीला’च्या एका रिपोर्टनुसार संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’चा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रीपोर्टनुसार याचा ट्रेलर २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच निर्माते तारीख जाहीर करणार असल्याचंही म्हंटलं जात आहे.

‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे व याच दिवशी विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांबरोबरच प्रभासचा ‘सलार’ व शाहरुख खानचा ‘डंकी’सुद्धा डिसेंबरमध्ये क्रिसमसच्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार आहे. कोणताही निर्माते आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यास तयार नसल्याने डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे.

Story img Loader