Udit Narayan Video Viral : प्रसिद्ध गायक उदित नारायण मागील काही दिवसांपासून त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. एका लाइव्ह शोमध्ये सेल्फी काढायला आलेल्या महिला चाहत्यांना त्यांनी किस केलं होतं, त्यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग नेटकऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. त्या व्हायरल व्हिडीओवर नंतर उदित यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. तो व्हिडीओ व्हायरल होऊन एक आठवडा उलटला आहे, त्यात आता त्यांचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदित नारायण यांचा महिला चाहत्यांना किस करतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांना सिरियल किसर म्हणू लागले आहेत. महिला फक्त सेल्फी घेण्यासाठी आल्या होत्या, पण उदित नारायण त्यांना किस करतात, तेही ओठांवर असं हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या एका युजरने म्हटलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दिसतंय की उदित नारायण मंचावर उभे आहेत आणि तिथे अनेक महिला त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला गर्दी करतात. आधी उदित व्हिडीओत थंब दाखवतात आणि नंतर एका चाहतीला ओठांवर किस करतात. एका व्हिडीओची कॉन्ट्रोव्हर्सी संपली नसतानाच आता या व्हिडीओमुळे उदित पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहेत.

पाहा व्हिडीओ –

७९ वर्षीय उदित नारायण मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. पहिला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड टीका झाली होती, मग उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

काय म्हणाले होते उदित नारायण?

“चाहते खूप वेडे असतात. आम्ही लोक असे नाही. मी सभ्य माणूस आहे. काही लोक या गोष्टी करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार? गर्दीत खूप लोक असतात, आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळतेय, म्हणून काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी हाताचं चुंबन घेतं. हे सगळं त्यांचं प्रेम आहे. याकडे फार लक्ष देऊ नये” असं ते म्हणाले होते.

“मला बॉलीवूडमध्ये ४६ वर्षे झाली आहेत, माझी प्रतिमा अशी नाही (की मी चाहत्यांना जबरदस्तीने किस करतो). खरं तर, माझ्या चाहत्यांनी माझ्यावर केलेले प्रेम पाहून मी हात जोडतो, स्टेजवर असताना मी नतमस्तक होतो,” असं उदित स्पष्टीकरण देताना म्हणाले होते.