अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न १९७३ साली झाले. त्यांच्या लग्नानंतर जया यांच्या आई-वडिलांच्या आयुष्यातही बरेच बदल झाले. जया यांचे वडील तरुण कुमार भादुरी एक प्रतिष्ठित पत्रकार होते. त्यांच्या मुलीने अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यावर त्यांचे आयुष्य कसे बदलले हे स्वतः सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुण कुमार भादुरी यांनी १९८९ मध्ये ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’साठी एका लेख लिहिला होता. यात त्यांनी जया व अमिताभ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांची माहिती दिली होती. शांततेत जगणारे हे कुटुंब अचानक लोकांच्या कुतुहलाचा विषय ठरले. आणि अचानक लोक त्यांना व त्यांच्या पत्नीला अमिताभ बच्चन यांचे सासू-सासरे म्हणून ओळखू लागले. लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे अनेक कार्यक्रमांसाठी निमंत्रण येऊ लागली, असंही त्यांनी सांगितलं होतं.

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

तरुण कुमार भादुरी आणि त्यांच्या पत्नीला क्लबचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रणं येऊ लागली. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसाठी बोलावलं जायचं. हे सगळं तरुण यांच्या कर्तृत्वामुळे नाही तर अमिताभ त्यांचे जावई असल्याने होतं, असं ते म्हणाले होते.

अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”

“माझ्या पत्नीला आणि मला ऑटोग्राफ बुक्सवर स्वाक्षरी करायला सांगितलं जातं. त्याचं कारण आम्ही जे आहोत ते नाही, तर जया आणि अमिताभ यांचे आम्ही नातेवाईक आहोत म्हणून. काही वर्षांपूर्वी, माझ्या पत्नीचे उत्तर प्रदेशातील एका हिल-स्टेशनवर सार्वजनिक स्वागत करण्यात आले होते, कारण काय तर ती जयाची आई आणि अमिताभची सासू होती म्हणून. मलाही एक नवीन ज्युडो क्लबच्या उद्घाटनासाठी एका गावात बोलावलं होतं, याचं कारण खास होतं. ते असं की अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन होते आणि त्यांच्या पद्धतीने चित्रपटाच अॅक्शन करायचे,” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं होतं.

रुग्णालयातील जखमी अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ शब्द ऐकून ओक्साबोक्शी रडलेल्या इंदिरा गांधी; म्हणालेल्या, “बाळा…”

तरुण कुमार भादुरी यांनी सांगितला होता विचित्र अनुभव

तरुण कुमार भादुरी हे पत्रकार होते, त्यांना हे फारसं पटत नव्हतं. “माझ्यामधील व्यावसायिक पत्रकाराला हे फारसं आवडलं नाही, पण माझ्यातील बाबाला फार आनंद झाला होता,” असं त्यांनी लिहिलं होतं. यावेळी त्यांनी एक विचित्र अनुभवही सांगितला होता. एका महिला संघटनेने त्यांना अमिताभ यांच्या कथित प्रेम प्रकरणांवर बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं. “एका गावात महिला संघटनेने मला अमिताभ यांच्या ‘अफेअर्स’वर बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं, यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. मी त्यांना म्हटलं की मी स्वतःच्याच कामात खूप व्यग्र आहे, त्यामुळे दुसऱ्यांच्या अफेअरबद्दल काहीच कल्पना नाही,” असं त्यांनी लिहिलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once jaya bachchan father was invited to speak about amitabh bachchan affairs at event hrc