शाहरुख खान व ऐश्वर्या राय हे बॉलीवूडमधील दोन दिग्गज कलाकार आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांनी जोश (२०००), मोहब्बतें (२०००), देवदास (२००२) आणि शक्ती: द पॉवर (२००२) सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध बिघडले. आजपर्यंत दोघांनीही त्याबद्दल थेट बोलणं टाळलं आहे. पण नंतरच्या काळात त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. खरं तर, ऐश्वर्याने स्वतः एकदा खुलासा केला होता की तिला शाहरुखबरोबरच्या किमान पाच चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं. यात ‘चलते चलते’ आणि ‘वीर जारा’ यांचा समावेश होता. यासाठी शाहरुखने नंतर ऐश्वर्याची माफी मागितली होती.
शाहरुखने माफी मागितल्यानंतरही त्याच्या व ऐश्वर्यादरम्यान वाद कमी होण्याआधी वाढला. ऐश्वर्याच्या सासू जया बच्चन यांचं शाहरुखशी जवळचं नातं आहे, पण त्यांनीही त्या काळात शाहरुखने ऐश्वर्याबद्दल केलेल्या काही टिप्पण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा – सध्या नेटफ्लिक्सवर चर्चेत आहेत ‘हे’ १० चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
२००८ मध्ये पीपल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत जया यांना शाहरुखबद्दल विचारण्यात आलं होतं. त्या अजूनही शाहरुखमुळे नाराज आहेत का असं विचारल्यावर त्यांनी होकार दिला होता. तसेच त्याला झापड मारली असती, असंही त्या म्हणाल्या होत्या. “मला त्याच्याशी याबद्दल चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही आणि मी त्याबद्दल त्याच्याशी बोलणार आहे. जर तो माझ्या घरी असता तर मी त्याला झापड मारली असती, जसं मी माझ्या स्वतःच्या मुलाला मारते. पण माझं त्याच्याशी खूप जवळचं नातं आहे त्यामुळे…”, असं जया बच्चन यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा – सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
शाहरुखचे बच्चन कुटुंबाशी, खासकरून जया यांच्याशी घट्ट नातं आहे. असं असलं तरीही शाहरुख २००७ मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नात आला नव्हता. कारण ‘चलते चलते’ या चित्रपटाच्या सेटवर शाहरुख व ऐश्वर्या रायचा वाद झाला होता. त्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. यावर भाष्य करताना जया म्हणाल्या होत्या, “ऐश्वर्या त्याला लग्नासाठी आमंत्रित करणार आहे का? मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास जर आम्ही त्याला लग्नाला बोलावलं असतं, तर आम्ही लग्नाची तारीख बदलली असती. मी माझ्या कुटुंबाला स्वातंत्र्य आणि स्पेस देऊ इच्छिते.”