बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली. आजही बरीच मंडळी सुशांतच्या मृत्यूचा धक्का पचवू शकलेले नाहीत. मध्यंतरीसुद्धा सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाने डोकं वर काढलं होतं. आज सुशांतची जयंती. बॉलिवूडमधील बरीच मंडळी सुशांतबद्दल भरभरून बोलतात, व्यक्त होतात. मध्यंतरी अभिनेत्री कियारा अडवाणीने सुशांतच्या एका सवयीचा खुलासा केला होता. सुशांतला फक्त २ तास झोप पुरायची असं तिचं म्हणणं होतं.
कियाराने सुशांतबरोबर ‘एमएस धोनी’ या चित्रपटात काम केलं आहे. तेव्हा तिने युट्यूबच्या ‘बियर बायसेप’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. सुशांतला २ तासही झोप पुरते, मुळात त्याचं याबाबतीत वेगळं मत होतं असंदेखील कियाराने या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
आणखी वाचा : सरोगसीवरुन ट्रोल करणाऱ्या लोकांना प्रियांका चोप्राने दिलं चोख उत्तर; मुलीबरोबर केलं खास फोटोशूट
कियारा म्हणाली, “सुशांत काहीसा इन्सोम्नियाक (निद्रानाश असलेलं) व्यक्तीच होता. मी शूटिंगनंतर प्रचंड थकायची आणि कधी एकदा झोपते असं व्हायचं, पण याबाबतीत मात्र त्याचं मत वेगळं होतं. तो म्हणायचा की मानवी शरीराला केवळ २ तास झोप पुरेशी असते. तुम्ही जेव्हा ७ ते ८ तास झोपता त्यावेळीसुद्धा तुम्ही जागेच असता, वास्तविक पाहता तुमचा मेंदू हा या ७ ते ८ तासांपैकी फक्त २ तासच शांत झोपलेला असतो. बाकीचे तास तुम्ही जरी झोपलेले असाल तरी तुमचा मेंदू कार्यरत असतो, हे त्याने मला सांगितलं.”
आणखी वाचा : ५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांतसिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलेले फक्त २१ रुपये, वाचा संपूर्ण किस्सा
पुढे कियारा त्याच्या याच सवयीबद्दल म्हणाली की “सुशांतला फक्त २ तास झोपही पुरेशी असायची, हे ऐकून मलाच आश्चर्य वाटायचं, पण दोन तास झोपूनही तो दुसऱ्या दिवशी तितकाच उत्साही असायचा. सेटवर तो अजिबात कंटाळलेला नसायचा. निदान माझ्यासाठी तरी ही खूपच चकित करणारी गोष्ट होती.” १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग सिंह राजपूतने बांद्रा येथील स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची चौकशी अजूनही सीबीआय करत आहे, अजूनही त्याच्या या केसला पूर्णविराम लागलेला नाही.