अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची एकदा पटकथाकार जावेद अख्तर यांच्याशी ‘मूळ अस्सल’ म्हणजे काय यासंदर्भात चर्चा झाली होती. शाह यांनी जावेद आणि सलीम लिखित ‘शोले’ हा चित्रपट चार्ली चॅप्लिन आणि हॉलिवूड चित्रपटकार क्लिंट इस्टवूड यांच्या कामाची नक्कल असल्यटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शोले’ सिनेमा जावेद अख्तर व सलीम खान यांनी लिहिला होता. हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावशाली भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला आठवतं, जावेद अख्तर एकदा मला म्हणाले होते, ‘जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा स्रोत सापडत नाही, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला मूळ अस्सल (Original) म्हणू शकता’. मी त्यांच्याशी शोलेबद्दल बोलत होतो. मी त्यांना म्हटलं ‘तुम्ही चार्ली चॅप्लिनचा आणि क्लिंट इस्टवूड यांचा एकही सिनेमा सोडला नाही. त्यांच्या सिनेमातील प्रत्येक दृश्याची नक्कल केली आहे. या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचं काम जाणवतं.”

अमिताभ बच्चन ‘शहेनशहा’ चित्रपटात करणार नव्हते काम; ‘या’ अभिनेत्याला मिळणार होती संधी, त्याने ३-४ सिनेमे साईन केले पण…

“पण तो म्हणाला, ‘तुम्ही संदर्भ कुठून घेतला हा प्रश्न नाहीये, तो संदर्भ वापरून किती पुढे नेला हा आहे’. मूळ अस्सलची व्याख्या करणं कठीण आहे. महान नाटककार विल्यम शेक्सपियरही जुन्या नाटकांमधील काही गोष्टींची नक्कल करत होते, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी ती नाटकं सादर केली, ते ओरिजनल होतं,” असं नसीरुद्दीन शाह शनिवारी एका कार्यक्रमात म्हणाले.

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा भारतीय सिनेमातील एक मैलाचा दगड मानला जातो. हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला होता. या चित्रपटात १९७० च्या दशकातील धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी आणि अमजद खान या कलाकारांनी काम केलं होतं.

“माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

‘निशांत’, ‘जाने भी दो यारो’, आणि ‘मिर्च मसाला’ या समांतर सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांनी नंतर व्यावसायिक सिनेमात स्वत:चे स्थान निर्माण केले. नसीरुद्दीन शाह मृणाल सेन, बासू चॅटर्जी सत्यजित रे, अनुराग कश्यप, आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या कामाचं कौतुक करतात.

नसीरुद्दीन शाहांनी या दिग्दर्शकांचं केलं कौतुक…

“मृणाल सेन, बासू चटर्जी, मिस्टर रे यांच्या चित्रपटांमध्ये नाविन्य होतं. ‘भुवन शोम’, ‘सारा आकाश’, ‘अंकुर’ सारख्या चित्रपटांना खूप कव्हरेज मिळाले, मात्र तसे चित्रपट बनवणारे लोक फार नव्हते. आता अनुभव सिन्हा, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानीसारखे लोक आहेत. राजकुमार हिरानी तर बासू चॅटर्जींचे उत्तराधिकारी आहेत. हा अशा लोकांचा गट आहे जो त्यांना ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्यावर चित्रपट बनवतात. अशा लोकांची दुसरी फळी तयार होण्याची शक्यता नाही, कारण आता चित्रपट उद्योगातील परिस्थिती खूप गंभीर आहे,” असं नसीरुद्दीन शाह यांनी नमूद केलं.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी केली पोस्ट, कॅप्शनने वेधले लक्ष

नसीरुद्दीन शाह म्हणाले की त्यांची ‘मॅन वुमन मॅन वुमन’ ही शॉर्टफिल्म ही या सर्व निर्मात्यांच्या कामाच्या समुद्रातील एक थेंब आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह, मुलगा विवान शाह, सबा आझाद आणि तरुण धनराजगीर यांच्या भूमिका आहेत. हा दोन पिढ्यांमधील प्रेम आणि सहवास दर्शवणारा २६ मिनिटांचा चित्रपट आयएफपीमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once naseeruddin shah said javed akhtar sholay is copy of charlie chaplin clint eastwood films hrc