ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेज बॉलीवूड वाइव्हज’ शोमधून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-अभिनेते दिवंगत राज कपूर यांची नात रिद्धिमाची कौटुंबीक पार्श्वभूमी अभिनयाची असूनही ती चित्रपटांपासून दूर राहिली. तिचा भाऊ रणबीर कपूर स्टार आहे, तिच्या चुलत बहिणी करिश्मा कपूर व करीना कपूर यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मात्र रिद्धिमाने अभिनयात करिअर केलं नाही. यामागचं कारण तिची आई नीतू कपूर यांनी सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीतू कपूर यांच्यामते, रिद्धिमाला आधीपासून माहीत होतं की तिने फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यात रस दाखवल्यास तिचे वडील नाराज होतील. त्यांच्यामुळेच तिने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र ‘खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ मध्ये रिद्धिमाच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. “मोठी होत असताना रिद्धिमाला हे ठाऊक होतं की जर तिने अभिनेत्री व्हायचं ठरवलं तर तिचे वडील आत्महत्या करतील”, असं नीतू यांनी लिहिलं. रिद्धिमामध्ये एक चांगली अभिनेत्री होऊ शकली असती, तिच्यात ते कौशल्य होतं, मात्र तिच्या वडिलांनी तिचा हा निर्णय कधीच स्वीकारला नसता, त्यामुळे तिने तिचं स्वप्न कधीच बोलून दाखवलं नाही असं नीतू यांनी नमूद केलं.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

“ती खूपच प्रतिभावान आणि सुंदर मुलगी आहे. ती उत्कृष्ट नक्कल करते. तिने अभिनेत्री म्हणून खूप चांगलं काम केलं असतं. मात्र, तिने अभिनेत्री व्हायचं ठरवल्यास तिचे वडील किती नाराज होतील हे तिला लहानपणापासून माहीत होतं. ते (ऋषी कपूर) अभिनेत्रींबद्दल वाईट विचार करत नाही किंवा मुलींनी चित्रपटात काम करू नये असं त्यांना वाटत नाही. मात्र ते आपली पत्नी व मुलीबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. त्यांच्यामुळे रिद्धिमाने कधीच अभिनयात करिअर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी ती म्हणाली, ‘मला कपडे डिझाइन करायचे आहेत,’ आणि तिच्या वडिलांनी तिला आनंदाने शिक्षणासाठी लंडनला पाठवलं,” असं नीतू कपूर यांनी पुस्तकात म्हटलंय.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

कपूर कुटुंबातील महिला त्या काळी चित्रपटांमध्ये काम करायच्या नाही. त्या सिनेसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहायच्या. राज कपूर यांच्या मुली सिनेमात आल्या नाहीत. बबिता आणि नीतू कपूर या दोन्ही सूनांनी लग्न झाल्यावर अभिनय सोडला. मात्र करीना व करिश्मा दोघींचं संगोपन आई बबिता यांनी केलं, त्या वडिलांबरोबर राहिल्या नाहीत. म्हणून आईच्या पाठिंब्यामुळे त्या इंडस्ट्रीत करिअर करू शकल्या.

हेही वाचा – बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

रिद्धिमा कपूर साहनीबद्दल बोलायचं झाल्यास तिने नंतर एन्फ्यूएन्सर म्हणून करिअर सुरू केलं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर १४ लाख फॉलोअर्स आहेत. रिद्धिमाला समारा नावाची मुलगी आहे. तिला अभिनेत्री व्हायचं आहे, असं रिद्धिमाने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once neetu kapoor said rishi kapoor would have killed himself if daughter riddhima wanted to become actress hrc