Aishwarya Rai – Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होत आहे. ऐश्वर्या राय कोणत्याही कार्यक्रमात मुलगी आराध्याबरोबर जाते, बच्चन कुटुंबाबरोबर ती दिसत नाही. अभिषेक बच्चनही ऐश्वर्या राय व आराध्याबरोबर नसतो. त्यामुळे या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र अद्याप या दोघांनी किंवा बच्चन कुटुंबाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत असताना सलमान खानचं एक जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या राय सलमान खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. ऐश्वर्या व सलमान यांच्या ब्रेकअपला दोन दशकांहून जास्त काळ उलटला असला तरी आजही त्यांची चर्चा होते. ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेकशी लग्न केलं. तिच्या लग्नानंतर एकदा सलमानला तिच्या व अभिषेकच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर सलमानने काय उत्तर दिलं होतं, ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?

ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नानंतर सलमान खान व ऐश्वर्या कधीच एकमेकांना भेटले नाहीत. पण सलमान बऱ्याचदा अभिषेकला भेटतो, त्याचं अभिषेक व बच्चन कुटुंबाशी चांगलं नातं आहे. सलमानने ऐश्वर्याच्या लग्नानंतर तिच्याशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्याने २०१० मध्ये रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

हेही वाचा – ‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी

सलमान खान काय म्हणाला होता?

‘सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरी गेला, काच फोडली आणि हाताला जखम करून घेतली, अशा बातम्या आल्या होत्या,’ असं विचारल्यावर सलमान म्हणाला, “मी काय बोलू सर? वैयक्तिक आयुष्य खासगीच राहायला हवं असं माझं मत आहे. आता मी स्वतःचा बचाव केला तर त्याचा अर्थ असा होईल की कोणीतरी माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होतं, हे मी नाकारतोय. त्यामुळे शांत राहणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आता इतकी वर्षे लोटली आहेत. ती एका छान कुटुंबात सुखी वैवाहिक आयुष्य जगतेय आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. अभिषेक खूप चांगला माणूस आहे. तुमचं एकमेकांबरोबरचं नातं संपल्यानंतर त्या व्यक्तीने दुःखी राहावं, असं कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटत नाही. आपल्याशिवाय समोरच्या व्यक्तीने आनंदी राहावं, असंच कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटतं,” असं उत्तर सलमान खानने दिलं होतं.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना सलमानची ही एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते दोघे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी जवळ आले, मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यानंतर विवेक ओबेरॉयची ऐश्वर्याच्या आयुष्यात एंट्री झाली आणि या दोघांचं नातं संपलं. त्यानंतर ऐश्वर्या व विवेकही वेगळे झाले आणि तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan wedding old statement viral hrc