बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही गेले कित्येक वर्षं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तब्बल ३ दशकांपासून तब्बू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजच्या काळातील कित्येक अभिनेत्रींनाही तिने कामाच्या बाबतीत मागे टाकलं आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी तिलाही प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. चित्रपटसृष्टीतील भेदभाव आणि कंपूशाहीला तब्बूदेखील बळी पडल्याचं तिने एकदा स्पष्ट केलं होतं.

एका चित्रपटातून तब्बूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता तेदेखील आमिर खानच्या सांगण्यावरुन. याबद्दल मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला होता. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन’ चित्रपटात प्रथम तब्बूला घेतलं होतं, पण नंतर काही कारणास्तव तिला यातून काढून मनीष कोईरालाला घेण्यात आलं. २००१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तब्बूने याविषयी खुलासा केला होता.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

आणखी वाचा : पहिल्या फोटोशूटसाठी सोनू सूदमुळे कुब्रा सैतला मिळालेली ५५% सूट; फोटो पाहून अभिनेत्री म्हणाली “माझी कंबर, क्लीवेज…”

तब्बू म्हणाली, “मला आमिर खानबरोबर एक चित्रपट करायला नक्कीच आवडला असता. आम्ही ‘मन’ या चित्रपटासाठी एकत्र फोटोशूटही केलं होतं. नंतर कॅमेराच्यामागे नेमकं काय घडलं याचा मला काहीच अंदाज नाही. हे मनोरंजनसृष्टीतील बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींच्या बाबतीत घडतं.” फक्त आमिरच नव्हे तर गोविंदाच्याही एका चित्रपटातून तब्बूला काढलं होतं. गोविंदाच्या ‘कुवारा’ चित्रपटात ऐनवेळी तब्बूच्या ऐवजी उर्मिला मातोंडकरला घेतलं होतं.

आणखी वाचा : ‘जवान’चं चित्रीकरण पूर्ण, शाहरुख खानने रचला नवा विक्रम; लवकरच येणार चित्रपटाचा टीझर

तब्बूने नंतर आमिर खानबरोबर ‘फना’ चित्रपट सोडला तर कशातच काम केलं नाही, अन् गोविंदासह काम करायची संधी कधीच तब्बूला मिळाली नाही. नुकतंच तब्बू अजय देवगणसह ‘दृश्यम २’ आणि ‘भोला’ या चित्रपटात दिसली. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता तब्बू विशाल भारद्वाज यांच्या ‘खुफिया’ आणि रीया कपूरच्या ‘द क्रू’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader